धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:52 AM2020-01-24T11:52:57+5:302020-01-24T11:53:14+5:30

तरूणांना प्राधान्य देण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार

The chances of every taluka in Dhule district get a chance | धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेच्या विषय सभापतींची निवड अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. सभापतीपदासाठी अनेकजण इच्छूक असले तरी प्रत्येक तालुक्यातून संधी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.त्यातच तरूणांनाही यात समावून घेतले जाण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तीन पक्षांची महाविकास आघाडी असतांनाही भाजपने स्वबळावर निवडणूक लढवित ५६ पैकी ३९ जागा जिंकून सत्ता मिळविली आहे.
ेंयावेळी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत साक्री वगळता उर्वरित तीनही तालुक्यांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. विशेष म्हणजे शिरपूर तालुक्यात सर्वच्या सर्व १४ जागांवर भाजपने विजय मिळविला. याठिकाणी दुसऱ्या पक्षांना खाते उघडण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे सहाजिकच अध्यक्षपदाचा बहुमान हा शिरपूर तालुक्याला मिळाला. तर उपाध्यक्षपदाचा बहुमान शिंदखेड्याला मिळाला आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर विषय सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अर्थ व बाधकाम समितीचे सभापतीपद हे उपाध्यक्षांकडे असेल. त्यामुळे उर्वरित चार समिती सभापतीपदासाठी चुरस निर्माण झालेली आहे. यात प्रत्येक तालुक्याला सभापतीपदाची संधी देवून समतोल साधण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार सुरू आहे.यात कोणत्या
तालुक्याला कोणते सभापतीपद मिळते याची उत्सुकता आहे.
अनेकांच्या नावाची चर्चा सुरू
सभापतीपदासाठी धुळे तालुक्यातून प्रा. अरविंद जाधव, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे, धरती देवरे, मनीषा खलाणे यांचे नाव चर्चेत आहे. साक्री तालुक्यातून मंगलाबाई सुरेश पाटील, हर्षवर्धन दहिते, शिंदखेडा तालुक्यातून ज्योती बोरसे, संजीवनी शिसोदे, तर शिरपूर तालुक्यातून मोगरा पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे समजते.

Web Title: The chances of every taluka in Dhule district get a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे