शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील भागासाठी ‘सीसीटीव्ही’! खरोखरच प्रश्न निकाली निघेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:58 IST

पोलीस प्रशासन। अत्याधुनिक वाहनांसह साधनांची आवश्यकता, दखल घेण्याची गरज

धुळे : धुळे शहरात वारंवार निर्माण होणारा तणाव लक्षात घेता उशिरा का असेना संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा विषय आता पटलावर आला आहे़ पण, ते लावून प्रश्न सुटणार का? हा मात्र प्रश्न अनुत्तरीतच आहे़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे क्रमप्राप्त ठरेल़ पोलिसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध करुन देण्याची नितांत आवश्यकता आहे़धुळ्यात २००८, २०१३ मध्ये झालेल्या दोन गटाच्या तणावानंतर उसळलेली दंगल लक्षात घेता यापुर्वीच जिल्हा नियोजन मंडळाच्या पटलावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा विषय चर्चेत आला होता़ मंडळाने तात्काळ परवानगी देऊन संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात हे कॅमेरा लावण्याचे नियोजन देखील करण्यात आले होते़ यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी बदलले, सत्ता परिवर्तन झाली़ तरीही हा विषय केवळ मंजुरीच्या आणि प्रस्ताव सादर करण्याच्या पायरीवरच आहे़बुधवारी धुळ्यात उसळलेल्या दंगल प्रकरणी पुन्हा हाच विषय प्रशासनाच्या पटलावर आला़ पालकमंत्र्यांनी तातडीने या कामांसाठी ५ कोटींची विशेष तरतूद देखील करुन दिली़ आता हा प्रश्न कधी मार्गी लागणार हे मात्र आजही गुलदस्त्यातच आहे़ केवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवून प्रश्न सुटणार आहेत का? संवाद आणि नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेऊन त्यातून मार्ग काढायला हवा़सद्याच्या परिस्थितीत पोलिसांकडे असलेली वाहनांची काय स्थिती आहे, हे जाणून घेत अत्याधुनिक अशी किमान ३० ते ३५ वाहने उपलब्ध करुन द्यायला हवीत़ शिवाय अन्य सामुग्री देखील उपलब्ध झाल्यास अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी यंत्रणा सज्ज होऊ शकेल़काळानुरुप बदल हवाचपुर्वीच्या आणि आत्ताच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये अमुलाग्र बदल होत असल्याचे चित्र दिवसेंदिवस समोर येत आहे़ त्यांचा बिमोड करण्यासाठी धुळे पोलीस त्या तुलनेत समक्ष असणे गरजेचे आहे़ त्यात इंटरनेट, संगणकासह अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची गरज व्यक्त होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे