शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

दस्तावेज तपासणी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:08 IST

साखळी उपोषण: धुळे जिल्ह्यातील अपंग समावेशित विशेष शिक्षक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अपंग समावेशित विशेष शिक्षक आक्रमक झाले असून सोमवारपासून त्यांनी तीन दिवसीय साखळी उपोषण सुरू केले आहे़अपंग समावेशित शिक्षक व परिचर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय भामरे यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालया जवळ उपोषण सुरू आहे़ मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे़२७ जानेवारीपासून सुरू केलेली विशेष शिक्षक दस्तावेज तपासणी रद्द करावी, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनाला सादर केलेल्या समायोजन प्रस्तावावर कार्यवाही करुन अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत कार्यरत सन २००९ नंतर नियुक्त विशेष शिक्षक व परिचर यांचे शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील रिक्त पदे समायोजन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करावा, विशेष शिक्षक व परिचर यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, शिक्षण संचालकांच्या पत्रान्वये शिक्षणाधिकाऱ्यांना वळते केलेले वेतन फक्त विशेष शिक्षकांची उपस्थिती ग्राह्य धरुन तात्काळ राज्यातील लाभार्थी विशेष शिक्षकांना अदा करावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़विशेष शिक्षकांची दस्तावेज तपाासणी रद्द होत नाही आणि समायोजनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत धुळे जिल्ह्यातील विशेष शिक्षकांचे आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष पंकज चौधरी, प्रदेश सरचिटणीस गिरीष महाले, महिला संघटक मनिषा पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष राकेश बोरसे, धुळे ग्रामीण तालुकाध्यक्ष तेजस सोनवणे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष विजेंद्र सूर्यवंशी, साक्री तालुकाध्यक्ष दिनेश देवरे, शिरपूर तालुकाध्यक्ष केशव पाटील, सागर ठाकूर, विशाल पाटील, प्रशांत बच्छाव, उज्वला पाटील, सारिका पाटील, राजश्री गिते, सारिका खैरे, कृष्णा अहिरे यांच्यासह विशेष शिक्षकांनी केली आहे़ आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अपंग समावेशित विशेष शिक्षक आक्रमक झाले आहेत़ आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे