धाेकादायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST2021-04-18T04:35:58+5:302021-04-18T04:35:58+5:30

पर्यटनाचा दर्जा हवा पिंपळनेर : साक्री तालुक्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पश्चिम पट्ट्यातील चरणमाळ भागात असलेल्या काका- काकी ...

Burning traffic | धाेकादायक वाहतूक

धाेकादायक वाहतूक

पर्यटनाचा दर्जा हवा

पिंपळनेर : साक्री तालुक्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पश्चिम पट्ट्यातील चरणमाळ भागात असलेल्या काका- काकी धबधब्याच्या क्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आदिवासी बचाव संघटनेने केली.

कोरोना चाचणी

धुळे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन केले असले तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विक्रेत्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. लसीकरण करण्याच्याही सूचना आहेत.

निर्जंतुकीकरण

धुळे : कोरोनामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये नियमित फवारणी केली जाते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सातत्याने काळजी घेताना दिसत आहेत. अभ्यागतांनाही प्रवेशबंदी केली आहे.

वेपोरायझरला मागणी

धुळे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना होवू नये, यासाठी नागरिकांकडून घरगुती उपाय केले जात आहेत. वाफ घेतल्याने सर्दी, खोकला होत नाही म्हणून वाफ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या वेपोरायझरची मागणी वाढली आहे.

Web Title: Burning traffic