लग्नाच्या आमिषाने मुलीला आसामला डांबून ठेवले

By Admin | Updated: March 18, 2017 00:46 IST2017-03-18T00:46:12+5:302017-03-18T00:46:12+5:30

नंदुरबार : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून आसाममध्ये पळवून नेत डांबून ठेवल्याची घटना घडली.

The bride's lover kept the girl in Assam | लग्नाच्या आमिषाने मुलीला आसामला डांबून ठेवले

लग्नाच्या आमिषाने मुलीला आसामला डांबून ठेवले

नंदुरबार : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून आसाममध्ये पळवून नेत डांबून ठेवल्याची घटना घडली. याप्रकरणी वडफळी येथील युवतीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून १६ मार्च रोजी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडफळी, ता.अक्कलकुवा येथील अल्पवयीन मुलीला गावातूनच विनोद चंपक तडवी, रा.आंबावाडी, ता.डेडीयापाडा, जि.नर्मदा याने लग्नाचे आमिष दाखवून              २७ फेब्रुवारी रोजी पळवून नेले.
 युवतीला थेट आसाम राज्यात नेऊन तेथे तिला डांबून ठेवले. युवतीने मोबाइलद्वारे तिच्या वडिलांना फोन करून आपबिती सांगितली.
पोलीस आसामकडे
मुलीच्या वडिलांनी तातडीने मोलगी पोलीस ठाणे गाठून विनोद तडवी याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. दरम्यान, युवतीच्या सुटकेसाठी             मोलगी पोलीस आसामला रवाना           झाले आहेत.

Web Title: The bride's lover kept the girl in Assam