बाजार समितीच्या प्रशासक मंडळाला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:41+5:302021-05-09T04:37:41+5:30

धुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रशासक मंडळाला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ...

The Board of Governors of the Market Committee has been extended till October 23 | बाजार समितीच्या प्रशासक मंडळाला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

बाजार समितीच्या प्रशासक मंडळाला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next

धुळे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रशासक मंडळाला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपलेली आहे. सध्या राज्य शासनाच्या आदेशानुसार खासगी प्रशासक मंडळ कार्यरत आहे. दरम्यान, आता कोरोनाच्या संकटामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली असून त्यानुसार प्रशासक मंडळाची मुदतदेखील वाढली आहे. बाजार समितीला मुदतवाढ मिळावी यासाठी काही संचालकांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. परंतु १८ पैकी १२ संचालकांनी एकाच वेळेस राजीनामा दिला आणि बहुमताचा कोरम पूर्ण होत नसल्यामुळे बाजार समितीला मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यानंतर बाजार समितीवर सहायक निबंधक मनोज चौधरी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाने पाच सदस्यीय खासगी प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार सध्या रितेश सैंदाणे, झुलाल पाटील, दिनेश माळी, किरण पाटील, सुदर्शन पाटील यांचे संचालक मंडळ कार्यरत आहे.

दरम्यान, बाजार समितींच्या प्रशासक मंडळास २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार विभागाने नुकताच घेतला आहे. कोरोनाच्या संकटामुळे बाजार समितीच्या निवडणुका घेता येणार नसल्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळे बाजार समितीचे खासगी प्रशासक मंडळ आता २३ ऑक्टोबरपर्यंत काम पाहणार आहे.

Web Title: The Board of Governors of the Market Committee has been extended till October 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.