खासगी व सरकारी डॉक्टरांचा भजनी मंडळाने केला कोरोना योद्धा म्हणून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:33 IST2021-08-01T04:33:31+5:302021-08-01T04:33:31+5:30

कोरोना काळात कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, नर्स या सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून ...

Bhajani Mandal honors private and government doctors as Corona Warriors | खासगी व सरकारी डॉक्टरांचा भजनी मंडळाने केला कोरोना योद्धा म्हणून सन्मान

खासगी व सरकारी डॉक्टरांचा भजनी मंडळाने केला कोरोना योद्धा म्हणून सन्मान

कोरोना काळात कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, नर्स या सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायाच्या रीतीरिवाजाप्रमाणे डॉक्टरांना टोपी, रुमाल, शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुनीता पाटील यांच्या हस्ते हभप गुरुवर्य कृष्णाजी माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना नूतन विद्यालयाचे शिक्षक संतोष एंडाईत यांनी केली. सूत्रसंचालन लाला माळी यांनी तर आभार प्रदर्शन हेमंत जयवंत चौधरी यांनी केले.

कोरोना योद्धा म्हणून कापडणे गावातील - खासगी डॉक्टर- डॉ. भूषण जैन, डॉ. भानुदास पाटील, डॉ. महेंद्र भामरे, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. भूषण गवडे, डॉ. भास्कर सैंदाणे, डॉ. सुरेश माळी, डॉ. बिसवास, तर प्राथमिक आरोग्य केंद्र कापडणे येथील वैद्यकीय अधिकारी सुनीता पाटील, आरोग्य कर्मचारी एच.एल. देवरे, संजय पाटील, डी.ए. पाटील, प्रमोद खैरनार, दीपक बाविस्कर, गणेश महाजन, नर्स मावची, सोनवणे, अनिता माळी, भारती पाटील, शितल भिल, अमोल माळी, भटू चौधरी आदींचा सन्मान करण्यात आला.

हभप गुरुवर्य कृष्णाजी माऊली भजनी मंडळाचे अध्यक्ष हेमंत चौधरी, उपाध्यक्ष गोकुळ माळी, सचिव संतोष एंडाईत, खजिनदार प्रकाश माळी, सदस्य चंद्रकांत चौधरी, लाला माळी, जगन्नाथ माळी, ईश्वर माळी, महेंद्र चौधरी, भिकन सैंदाणे, शेखर पेंटर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन केले होते.

फोटो कॅप्शन - हभप गुरुवर्य कृष्णाजी माऊली भजनी मंडळाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र कापडणे वैद्यकीय अधिकारी सुनीता पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करताना.

Web Title: Bhajani Mandal honors private and government doctors as Corona Warriors