शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पटेल ‘अभियांत्रिकी’ला स्वायत्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 22:48 IST

ऑटोनाॅमस काॅलेज : विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता 

धुळे : नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून स्वायत्त महाविद्यालय (ऑटोनॉमस कॉलेज) म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे स्वायत्ततेसाठी प्रस्ताव सादर करून त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली होती. याच अनुषंगाने यूजीसीद्वारे गठीत स्वायत्तता समितीने ११ व १२ डिसेंबर रोजी महाविद्यालयास भेट दिली होती. या समितीने महाविद्यालयातील मूलभूत सोयीसुविधा तसेच महाविद्यालयाने संशोधन, विद्यापीठ परीक्षा व कॅम्पस प्लेसमेंट, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेऊन स्वायत्तता देण्यासाठी शिफारस केलेली होती.स्वायत्ततेमुळे आता महाविद्यालयास नवनवीन संकल्पना राबविण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत झालेले सामंजस्य करार व त्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल करून विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविले जाईल. जर्मनी, जापनीज, फ्रेंच या सारख्या फॉरेन लँग्वेजेसला अधिकृतरित्या अभ्यासक्रमात सामाविष्ट करून घेतल्याने त्याचा फायदा कॅम्पस प्लेसमेंटसाठी मोठ्या प्रमाणात होईल. स्वायत्तता मिळविण्याच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख मिल्केश जैन,जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन आदींनी परिश्रम घेतले.शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिश पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्री पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतन पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे