एटीएम बंद असल्याने ग्राहकांचे होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:14+5:302021-03-13T05:05:14+5:30

रुग्णालयांमध्ये दरफलक लावण्याची मागणी धुळे : अनेकदा रुग्णांना रुग्णालयातील दरांबाबत काहीच माहिती नसते. अशातच काही ...

As ATMs are closed, customers are suffering | एटीएम बंद असल्याने ग्राहकांचे होताहेत हाल

एटीएम बंद असल्याने ग्राहकांचे होताहेत हाल

रुग्णालयांमध्ये दरफलक लावण्याची मागणी

धुळे : अनेकदा रुग्णांना रुग्णालयातील दरांबाबत काहीच माहिती नसते. अशातच काही रुग्णालये रुग्णांकडून जास्त पैसेही घेत असतात. बऱ्याचदा रुग्णांचे नातेवाईक याबाबत तक्रार करीत असतात. त्यामुळे सर्वच हॅास्पिटलमध्ये उपचार दरफलक लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेचेही लक्ष असणे गरजेचे आहे.

शहरात धावतात विना परमिटच्या रिक्षा

धुळे : शहरामध्ये बऱ्याच रिक्षा विना परमिटच्या फिरताना दिसून येतात. तरीही वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. रिक्षा चालक पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातून स्क्रॅप झालेल्या रिक्षा खरेदी करतात. या रिक्षाच शहरातून चालविल्या जातात. याच रिक्षांतून चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करताना दिसून येतात.

अवैध प्रवासी वाहतुकीने जीव टांगणीला

धुळे : शहरातून कालीपिलीद्वारे ग्रामीण भागात प्रवाशांची वाहतूक केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याने जीव धोक्यात घालून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. शहरातून शिरपूर, साक्री व परिसरात कालीपिलीद्वारे वाहतूक केली जाते. काही ठिकाणी एस.टी.ची सोय नसल्याने नाइलाजाने खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागताे.

Web Title: As ATMs are closed, customers are suffering