शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यापेक्षा त्यांची व्यवस्था करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयात ९ व्हेंटिलेटर मिळालेले आहेत; परंतु ते बंद अवस्थेत आहेत. ते सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे ...

दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयात ९ व्हेंटिलेटर मिळालेले आहेत; परंतु ते बंद अवस्थेत आहेत. ते सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे गावितांकडे मागणी केली, मात्र त्यांनी खासदारऐवजी आमदार निधीचा उपयोग करा, असे सांगून स्वत:चा निधी देण्यास टाळाटाळ केली़

२२ रोजी येथील तहसीलदार केबिनमध्ये कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी खासदार डॉ़ हिना गावित, आमदार काशीराम पावरा, प्रांताधिकारी डॉ़ विक्रमसिंग बांदल, तहसीलदार आबा महाजन, नपा सीईओ अमोल बागुल, डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, बीडीओ युवराज शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रसन्न कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ ध्रुवराज वाघ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते़

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ ध्रुवराज वाघ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रसन्न कुलकर्णी यांनी तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाची माहिती खासदार गावितांना दिली.

शहरातील परिस्थिती नमूद करताना डॉ़ वाघ म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय फक्त कोविड रुग्णांसाठी घोषित केलेले आहे. १०० बेड असलेल्या रुग्णालयात सर्व बेड भरलेले आहेत. तालुक्यातील शासकीय रुग्णालयात एकमेव मोठे रुग्णालय असल्याने तालुक्यातील गंभीर आजार असलेल्या, विविध गुन्ह्यांत शारीरिक इजा झालेल्या आणि आवश्यकतेनुसार मृत झालेल्या काही व्यक्तींचे पीएमदेखील उपजिल्हा रुग्णालयात करावे लागत असल्याने कामांचा ताण वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये सर्वतोपरी काम करत आहोत शिवाय अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्यावर खासदार गावित म्हणाल्या, तालुका आरोग्य विभागाकडून आवश्यकतेनुसार कर्मचारी घ्या. त्यांना रोटेशन पद्धतीने ड्यूटी लावा. जेणेकरून उपजिल्हा रुग्णालयावर येत असलेला ताण कमी होईल. तसेच कोविड व्यतिरिक्त असलेल्या रुग्णांना नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये पाठवा.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुलकर्णी म्हणाले, शिंगावे कोविड सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील २५ बेड ऑक्सिजन आहेत तर ७५ बेड साधारण आहेत. सद्य:स्थितीत येथे ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित आरोग्य कर्मचारी कोविड रुग्णांचे ट्रेसिंग आणि लसीकरण सर्वेक्षण करत आहेत. यावर खासदार गावित म्हणाल्या, ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अचूक आणि काटेकोरपणे सर्वेक्षण घेण्याचे निर्देश द्या. कोविड रुग्ण असलेल्या परिवारातील सर्व सदस्यांची तत्काळ कोरोना चाचणी करा. त्यातील कोणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना जवळच्या कोविड सेंटरमध्ये घेऊन जा. परिवारात एकाही व्यक्तीला कोरोना झाल्यास त्या व्यक्तीच्या परिवारातील अन्य सदस्य सुपरस्प्रेडर म्हणून काम करत असतात म्हणून त्यांना होम आयसोलेशनचे सर्व नियम समजावून सांगा.

तहसीलदार आबा महाजन म्हणाले, तालुक्यात आॅक्सीजन सिलेंडरचा तुटवडा असल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २६ आॅक्सीजन सिलेंडर आरोग्य विभागाला उपलब्ध करून दिले. परंतु ते सिलेंडर भरण्यास अडचणी येत आहेत.

तद्नंतर डॉ़वाघ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाला हक्काचे ९ व्हेंटिलेटर मिळालेले आहेत. परंतु ते बंद अवस्थेत आहेत. ते सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे गावीतांना संगितले. त्यावर गावीत यांनी हा निधी आमदार काशीराम पावरा यांच्या आमदार निधीतून घेण्यास सांगितले. एकंदरीत खासदार गावीत यांनी आजच्या आढावा बैठकीत मार्गदर्शनाशिवाय काहीच ठोस मदत शिरपूर तालुक्याला दिली नाही.

आदिवासी भागात लसीकरणाविषयी अजूनही गैरसमज आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात मोहीम राबवली पाहिजे.

ग्रामीण भागात तसेच शहरात असलेल्या होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या संदर्भात प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्यात त्यांनी गावागावात असलेल्या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना घरी न राहू देता त्या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा, मंगल कार्यालय अथवा इतर कोणत्यातरी कार्यालयात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. होम आयसोलेशन मधील हे रुग्ण सर्वदूर फिरत आहेत. तसेच शहरात व ग्रामीण भागात बाजाराला जात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी होम आयसोलेशनमधील रुग्ण कळीचा मुद्दा ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याची सूचना डॉ ग़ावित यांनी केली.