शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वडजाई येथे पूर्णवेळ ग्रामसेविकेची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

वडजाई : येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेविका म्हणून सारिका परदेशी या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वडजाईसह साक्री तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा कारभार आहे. ...

वडजाई : येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेविका म्हणून सारिका परदेशी या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वडजाईसह साक्री तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा कारभार आहे. त्यामुळे वडजाई येथील कामांना खीळ बसत असून, गावासाठी पूर्णवेळ ग्रामसेविकेची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्रामसेवक हा शासनाचा प्रतिनिधी असतो. शासन व नागरिक यांच्यामधला दुवा असतो. ग्रामसेवकच नसेल तर ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज ठप्प होते. त्यामुळे विकासकामांसह गावकऱ्यांच्या कामांना ‘ब्रेक’ लागतो. येथे ग्रामसेविका म्हणून सारिका परदेशी कार्यरत आहेत. परंतु, त्यांच्याकडे साक्री तालुक्यातील बळसाणे व वडजाई अशा दोन गावांचा कार्यभार आहे. गावात त्या आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस हजेरी लावतात, बाकी जास्तीत जास्त वेळ त्या साक्रीकडील गावात देत असतात. त्यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबतात. यात जन्म व मृत्यू दाखले, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, साफसफाई, आरोग्य, जन्म-मृत्यू नोंदणी, शासकीय योजनांची माहिती व योजनांविषयी गावकऱ्यांना माहितीच मिळत नाही. विवाह नोंदणीसाठी कागदपत्रांवर सह्या आदींसाठी ग्रामस्थांना सारखा ग्रामसेवकांना फोन करावा लागतो. परंतु, त्या फोन उचलत नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या वडजाई गावासाठी स्वतंत्र ग्रामसेविकेची नियुक्ती करण्याची गरज आहे. पूर्णवेळ ग्रामसेविकेची नियुक्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.