कुरखळी गावात ५० जणांची अँटीजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:24+5:302021-04-20T04:37:24+5:30

कोरोनाचा सर्वत्र वाढत चाललेल्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी जि.प.सदस्य दिनेश मोरे, सरपंच ...

Antigen test of 50 people in Kurkhali village | कुरखळी गावात ५० जणांची अँटीजेन टेस्ट

कुरखळी गावात ५० जणांची अँटीजेन टेस्ट

कोरोनाचा सर्वत्र वाढत चाललेल्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी जि.प.सदस्य दिनेश मोरे, सरपंच सीताराम भील, केंद्रप्रमुख तथा गटसमन्वयक रवींद्र सोळंके यांच्या उपस्थितीत शनिवारी ग्रामस्तरीय समितीची सभा घेण्यात आली.

यावेळी गोपाल कुमावत यांनी कोरानाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत दिनेश मोरे यांनीही अधिकाऱ्यांना गावात कोरोनाचा प्रसार रोखण्यासंबंधी कडक उपाययोजना करून लक्षणे असणाऱ्यांच्या त्वरित अँटिजेन टेस्ट करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गावात २ पथके तयार करून गावातील संशयित रुग्णांचा तपास करून तपासणी करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले.

, तर दुसऱ्या पथकाने ५० जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली.

यापैकी एकही व्यक्तीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला नाही.

ग्रामस्तरीय पथकात सरपंच सीताराम भिल, ग्रामसेवक बी़ एस़ चव्हाण, पोपटराव शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य जगदीश मोरे, देवीदास कोळी, रमेश जगदेव, पावबा धनगर, पराग मोरे, यांच्यासह आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, माध्यमिक शाळेचे शिक्षक अरविंद माळी, कृषी सहायक शिवराज माळी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर आदींचा समावेश आहे. आरोग्य पथकात एम़. एस़. राठोड, एस़. डी़. सावळे, के़. बी. फ़ुलपगारे, पी़. एस़. साळुंखे, के़. एस़. ठाकूर, एम़ ए़. सोनार यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घेतली.

Web Title: Antigen test of 50 people in Kurkhali village