प्राथमिक शिक्षकांनाही कोरोना लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST2021-03-20T04:35:25+5:302021-03-20T04:35:25+5:30

निवेदनात म्हटले आहे, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर ...

Also give corona vaccine to primary teachers | प्राथमिक शिक्षकांनाही कोरोना लस द्या

प्राथमिक शिक्षकांनाही कोरोना लस द्या

निवेदनात म्हटले आहे, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनीही लाॅकडाऊनच्या काळात महामार्गावर गस्त घालणे, स्वस्त धान्य दुकानांवर नियंत्रण ठेवणे, गावोगावी सर्वेक्षण करणे, ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होणे आदी कामात सक्रिय सहभाग नोंदवून ग्रामीण भागात कोरोना नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले. शिक्षकांनीही कोरोना योद्ध्यांचे काम केले आहे. अशा परिस्थितीत आता कोरोना प्रतिबंधक लस आलेली आहे. ही लस महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग आदी विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. परंतु अजून शिक्षकांना देण्यात आली नाही. म्हणून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस द्यावा, या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, शिक्षणाधिकारी मनीष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. नवले यांना देण्यात आले.

लवकरच या मागणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या वेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भुपेश वाघ, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, जिल्हाप्रमुख संघटक हृषीकेश कापडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Also give corona vaccine to primary teachers