वाहनातून दारू पकडली, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:13+5:302021-05-08T04:38:13+5:30

सोनगीर पोलिसांना मध्यरात्री शिरपूरकडून आलेल्या एका वाहनात बनावट देशी- विदेशी दारू असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांना वाघाडी ...

Alcohol seized from vehicle, charges filed against both | वाहनातून दारू पकडली, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वाहनातून दारू पकडली, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोनगीर पोलिसांना मध्यरात्री शिरपूरकडून आलेल्या एका वाहनात बनावट देशी- विदेशी दारू असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांना वाघाडी फाट्याजवळील एका हॅाटेलच्या परिसरात कार (एमएच- ०२ बीजे- २५१९) संशयास्पद उभी असल्याचे दिसून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेत एक जण पळून गेला. तर चालकाला पकडून विचारपूस करीत गाडीची तपासणी केली. त्यात कारच्या डिक्कीत वीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू आढळली. यावेळी वाहन चालकाकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना बेकायदेशीररीत्या दारू वाहतूक करीत असल्याचे आढळले. पोलीस नाईक शिरीश भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चालक सोमनाथ ऊर्फ आबा नाना कोळी (23), रा. खांमखेडा, ता. शिरपूर) तर पळून गेलेला बाबू खाटीक (रा. शिरपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. जप्त केलेल्या वाहनांची किंमत अंदाजे तीन लाख रुपये व सुमारे वीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू असा तीन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम यांनी केली.

Web Title: Alcohol seized from vehicle, charges filed against both