शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील कारागृहात जागविल्यात  आचार्य विनोबाजींच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:38 IST

१२५ वी जन्मशताब्दी: साºया बंदीवानाच्या डोळ्यात तरळले अश्रू

धुळे : भारतरत्न, भुदान चळवळीचे राष्ट्रीय संत आचार्य विनोबाजी भावे यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त धुळ्यातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आजच्या पिढीला माहिती नसललेल्या जुन्या व दुर्मिळ आठवणी साम्ययोग मासिकाचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार रमेश दाणे यांनी आपल्या मनोगतातून सांगण्याचा प्रयत्न केला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृहाच्या अधिक्षिका दिपा आगे या होत्या़दाणे यांनी १९३२ मधील धुळे कारागृहातील प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा नुकतेच जमनालाल बजाज यांनी प्रकाशित केलेले विनोबा भावेंचा ‘गिताई’ हा ग्रंथ देशभरात पोहचला होता़ येथील कारागृहातही त्याच्या प्रती आलेल्या होत्या़ त्याचे लिखाण साने गुरुजी करीत होते़ प्रवचनाचा शेवटचा दिवस होता़ तेव्हा साºया कैद्यांनी तुरुंग अधिकाºयांकडे दोन आणे मागितले़ ते त्यांच्या भत्त्यातून आणि आम्ही सारे कैदी एकवेळेचे जेवण घेणार नाही, या अटीतूऩ इंग्रजी अधिकाºयाने विचारले की या दोन आण्याचे तुम्ही काय कराल? त्यावेळेस सारे कैदी म्हणाले होते, की आम्ही एका आण्याचे गिताई पुस्तक घेऊ आणि एक आणा विनोबाजींच्या भूदानसारख्या राष्ट्रीय विधायक कार्यासाठी देवू़ हे वाक्य ऐकताच त्यावेळेस असलेल्या कारागृहातील बंदिवानांनी उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजविल्या़ अध्यक्षीय भाषणात दिपा आगे यांनी विनोबाजींच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला़ याप्रसंगी माजी नगरसेवक कैलास चौधरी, दलित मित्र मधुकर शिरसाठ, मालती शिरसाठ, सुनील देवरे, जितेंद्र शाह, प्रा़ महेश भालेराव, अशोक गाळणकर, कारागृह आहार निरीक्षक रंजना नेवे, जगदीश देवपूरकर, तुरुंग अधिकारी एऩ एच़ कन्नेवाड, नेहा गुजराथी आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत पोतदार यांनी केले़ बंदिवान स्त्री-पुरुष उपस्थित होते़ कारागृहात गितांचा कार्यक्रममाजी नगरसेवक कैलास चौधरी यांच्या सौजन्याने विनोबाजींच्या जयंतीनिमित्त भक्तीगिते आणि राष्ट्रभक्तीपर गितांचा कार्यक्रम पार पडला़ अकबर शाह - अरीफ मुजावर, राजेश खलाने, युवराज निकुंभे या कलावंतांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला़ फुलो का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, या गिताला तर साºया बंदिवान भगिनीच्या डोळ्यात अश्रू तराळले होते़