शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

५१ अंगणवाड्या होणार डिजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:37 IST

धुळे जिल्हा : एका अंगणवाडीसाठी १ लाख ३३ हजार रूपये खर्च, आतापर्यंत दोन अंगणवाड्यांचे काम पूर्ण

धुळे : जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजीटल झालेल्या असून, आता जिल्ह्यातील अंगणवाड्यांची वाटचालही डिजीटलच्या दिशेने होऊ लागली आहे. २०१७-१८ या वर्षांतर्गत जिल्ह्यातील ५१ अंगणवाड्या डिजिटल होणार असून, यापैकी दोन अंगणवाड्यांचे डिजीटलायजेशन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिली आहे.्रअंगणवाडीमध्ये महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार व कुपोषण या अन्य बाबीकडे लक्ष पुरविणे अशा कार्याचा समावेश अंगणवाडीमध्ये होत असतो.शिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. ग्रामीण अथवा दुर्गम भागातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडीतूनच होत असतो.जिल्ह्यात २१०४ अंगणवाड्याधुळे जिल्ह्यात २,१०४ अंगणवाड्या आहेत. त्यामार्फत ३ ते ६ वर्षे वयोगटातील ८७ हजार ९०१ बालके या ठिकाणी शिक्षण, आहार घेण्यासाठी येत असतात.आता डिजीटलकडे वाटचालजिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ११०३ शाळा दोन वर्षांपूर्वीच डिजीटल झालेल्या आहेत. काही ठिकाणी डिजीटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत केल्याने, डिजीटल शाळा नावालाच उरलेल्या आहेत.दरम्यान आता जिल्हा परिषद शाळांपाठोपाठ अंगणवाड्यांचीही डिजीटलकडे वाटचाल सुरू आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील निधीतून ५१ अंगणवाड्यांना डिजीटलसाठी मंजुरी मिळालेली आहे.अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत एक टीव्हीसेट, टॉकिंग पेन, लॉजिक बोर्ड, सॉफ्टवेअर फॉर अंगणवाडी आदी साहित्य बसविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक अंगणवाडीत सोलर पावर पॅक बसविण्यात येणार आहे. एक अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी १ लाख ३३ हजार १५० रूपये खर्च येणार आहे.५१ अंगणवाड्यांमध्ये टीव्ही, टॉकिंग पेन, लॉजिक सॉफ्टबोर्ड, त्याचबरोबर सोलर पॉवर पॅक बसविण्यासाठी एकूण ६७ लाख ९० हजार ६५० रूपये खर्च मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यातील ६५ अंगणवाड्या डिजीटल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना डिजीटलद्वारे शिक्षण मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे