शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

५ टक्के रुग्ण १६ वर्षांखालील, पण लस नाही;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST

१८ वर्षांवरील तरुणांना मिळणार १ मेपासून लस; निर्णय झाला असला तरी आदेशाची प्रतीक्षा धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह ...

१८ वर्षांवरील तरुणांना मिळणार १ मेपासून लस; निर्णय झाला असला तरी आदेशाची प्रतीक्षा

धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह जिल्ह्यात महामारी पसरली असताना त्याचा स्ट्रेनही बदलला आहे. पहिल्या लाटेत ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. परंतु आता ४५ च्या आतील व्यक्ती आणि १८च्या आतील मुलांनादेखील कोरोना होत आहे. त्यामुळे कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन धोकेदायक ठरत आहे.

१८ ते ४५च्या आतील रुग्णांचे प्रमाण २७ टक्के आहे. असे असले तरी या वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अजून सुरू झालेले नाही. दरम्यान, १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला तरी हे लसीकरण १ मेपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वयोगटातील मृत्युदरदेखील दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य विभागासह शासन-प्रशासनालादेखील चिंता आहे. या वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाची प्रतीक्षा आहे. परंतु ४५ वर्षांवरील निम्मेपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण अजून झालेले नाही.

कोरोनाच्या या संसर्गात सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांनादेखील कोरोना होण्याचा धोका वाढला आहे. १६ आणि १८ वर्षांच्या आतील रुग्णांचे प्रमाण सध्या ५ टक्के आहे. १८च्या आतील मुलांना लस देण्याबाबत अजून कोणताही निर्णय नाही. त्यामुळे भविष्यात या वयोगटामध्येदेखील संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

३५ ते ४५ वयोगटांतील कोरोनाबाधितांचा मृत्युदरदेखील वाढताे आहे. या वयोगटातील काही तरुणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यूचे आकडे केवळ सरकारी रुग्णालयांचे जाहीर होत आहेत. खासगी रुग्णालयांचे आकडे जाहीर होत नसल्याने बाधितांचा आणि मृतांचा नेमका आकडा समोर येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

१६ वर्षाखालचे ५ टक्के रुग्ण, पण लसच उपलब्ध नाही

धुळे जिल्ह्यात १६ आणि १८ वर्षांखालील ५ टक्के रुग्ण आहेत. परंतु या वयोगटाला अजूनपर्यंत लसीकरण सुरू झालेले नाही.

या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढत असताना शासनाने अजूनपर्यंत त्यांना लस उपलब्ध करून दिली नसल्याने पालकांमध्ये चिंता आहे.

लसीकरण नसल्याने या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वच वयोगटांतील नागरिकांना लसीकरणाची मागणी आहे.

काेरोनामुक्त झालेल्या इस्त्राईल देशात केवळ दोन टप्प्यांत लसीकरण झाले. त्याप्रमाणे सर्वांनाच दुसऱ्या टप्प्यात लस उपलब्ध करावी, अशी मागणी आहे.

४५ पेक्षा कमी वयाचे २७ टक्के रुग्ण; पण लसीकरण सुरू नाही

४५ पेक्षा कमी वयाचे २७ टक्के रुग्ण आहेत. परंतु या वयोगटासाठीदेखील लसीकरण सुरू झालेले नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे.

१८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचे दिशानिर्देश अजीन राज्य शासनाला प्राप्त झाले नाहीत.

मुलांसाठी लस येत नाही तोपर्यंत

मुलांसाठी लस येत नाही तोपर्यंत सर्वच कुटुंबांना आपापल्या मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे.

लहान मुलांना लसीकरण नसल्याने शाळा तर बंदच आहेत, शिवाय सर्वच शिक्षण मंडळांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.