शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

30 हजारांची दारू व मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 00:12 IST

शहादा पोलिसांची कारवाई : मानमोडे गावाजवळ ‘गावठी’चे अड्डे उद्ध्वस्त

मंदाणे : शहादा तालुक्यातील मानमोडे येथील नदीकाठावर मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत सुमारे 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैधरीत्या दारू तयार करणा:यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांची गाडी दिसताच दारू तयार करणा:यांनी पळ काढला.    याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील मानमोडे गावाचा स्वच्छता अभियानात व निर्मलग्राम योजनेत उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात नावलौकिक आहे. मात्र अलीकडच्या काळात या ठिकाणी जवळच असलेल्या नदीवर ठिकठिकाणी हातभट्टीची रसायनयुक्त दारूची निर्मिती करून ती विक्री करण्याचे जणू केंद्रच बनले आहे. अशा स्थितीत शहादा पोलिसांना मानमोडे गावाजवळ गावठी हातभट्टीच्या दारूची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होऊन शेकडो लीटर दारू विक्री           केली जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच डीवाय.एस.पी. लतीफ तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी हवालदार दासू वसावे, धनराज जाधव, प्रकाश तमखाने, राहुल बोराडे, छोटूलाल पावरा, बलविंदर ईशी, अरुण चव्हाण, करण वळवी, अफसर शहा, देवीदास गागडे, सुनील वाकडे आदी सहका:यांसह मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मानमोडे गावाजवळील म्हैस नदीवरील अवैधरीत्या गावठी हातभट्टीचे दारू तयार करण्याच्या ठिकाणी अचानक छापा टाकला. त्या वेळी दारू            तयार करणा:यांनी पोलिसांची गाडी दुरूनच पाहून पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी दारू तयार करण्याचे अड्डे तत्काळ उद्ध्वस्त केले. प्लॅस्टिकचे ड्रम, पत्र्याच्या टाक्या व मातीच्या माठांमधील महू, रसायनाचे मिश्रण नष्ट केले व रबरी टय़ूबमध्ये असलेली सुमारे 200 ते 250 लीटर तयार  दारू, रिकामे केलेले 10 ड्रम, घागरी, माठ, पाच पत्र्याच्या टाक्या असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशनला करणसिंग वळवी, बलविंदर ईशी व अरुण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील चंद्रसिंग पावरा, राजेश वेल्ला पावरा, सरवी देवीसिंग पावरा, सर्व रा.मानमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    (वार्ताहर)


धाडसत्र सुरूच राहणार
मानमोडे येथील दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याने मोठा दारूसाठा जप्त करण्याच्या पोलिसी कारवाईमुळे परिसरात ठिकठिकाणी अवैधरीत्या गावठी हातभट्टीची तसेच बनावट दारूची विक्री करणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे. दारू तयार करून विक्री करणा:यांनी असे अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत, अन्यथा अशा प्रकारचे धाडसत्र सुरूच ठेवले जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिला आहे.
मानमोडे येथील दारू अड्डय़ावर धाडसत्र सुरू होताच दारू तयार करणा:यांनी लांबूनच गाडी बघून पळ काढला. मात्र त्यांची नावे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस लवकरच ताब्यात घेणार असल्याचे समजते.