लॉकडाऊन काळात २७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 09:43 PM2020-08-05T21:43:58+5:302020-08-05T21:44:16+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय : मदतीच्या निकषात पाच प्रस्ताव पात्र, १० अपात्र तर १२ प्रलंबित

27 farmers commit suicide during lockdown | लॉकडाऊन काळात २७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

dhule

Next

धुळे : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात २७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यापैकी अर्थसहायासाठी केवळ पाच प्रस्ताव पात्र ठरले असून दहा प्रस्ताव अपात्र ठरले आहेत़ उर्वरीत १२ प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली़
कोरोनाच्या काळात मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण २७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची प्रशाकीय आकडेवारी आहे़
मार्च महिन्यात सहा आत्महत्या झाल्या असून त्यापैकी अर्थसहायासाठी दोन प्रस्ताव पात्र ठरले आहेत़ तीन प्रस्ताव अपात्र तर एक प्रस्ताव फेरचौकशीसाठी प्रलंबित आहे़
एप्रिल महिन्यात एक आत्महत्या झाली असून सदर आत्महत्येचा प्रस्ताव अर्थसहायासाठी अपात्र ठरला आहे़
मे महिन्यात सहा आत्महत्यांपैकी दोन पात्र तर चार प्रस्ताव अपात्र ठरले आहेत़ मे महिन्यात झालेल्या आत्महत्यांपैकी एकही प्रस्ताव प्रलंबित नाही़
जून महिन्यात सात शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यापैकी मदतीसाठी केवळ एकच प्रस्ताव पात्र ठरला असून चार प्रस्ताव अपात्र तर दोन प्रस्ताव प्रलंबित आहेत़
जुलै महिन्यात ७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यांच्या कुटूंबियांनी मदतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत़ हे सर्व प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत़
तत्पूर्वी शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात १४ जुलै रोजी झाली होती़ या बैठकीत एकूण सात प्रस्ताव पात्र ठरले होते़ तर पाच प्रस्तावांची फेरचौकशी करण्याचा निर्णय घेतला होता़
संबंधित तहसीलदारांनी चौकशी करुन सदरचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते. या बैठकीत एकूण २३ प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यापैकी सात प्रस्ताव मंजूर झाले. ११ प्रस्ताव अपात्र ठरले. पाच प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. धुळे ग्रामीणमधील २, शिंदखेडा तालुक्यातील ४, दोंडाईचा अपर तहसिल कार्यालयाच्या अखत्यारितील एका प्रस्तावाचा समावेश आहे़
समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय यादव होते. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम, शिंदखेड्याचे तहसिलदार साहेबराव सोनवणे, शिरपूरचे तहसिलदार आबा महाजन, साक्रीचे तहसिलदार प्रवीण चव्हाणके, दोंडाईचाचे अपर तहसीलदार सुदाम महाजन, धुळे शहराचे तहसिलदार संजय शिंदे , पिंपळनेरचे अपर तहसिलदार विनायक थवील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीतील काही प्रस्तावांची फेरचौकशी सुरू आहे़
कुटूंबियांना मिळते एक लाखाची मदत
शेतकºयाची आत्महत्या मदतीच्या निकषात बसली तर त्याच्या कुटूंबियांना एक लाखाची आर्थिक मदत शासनातर्फे केली जाते़ त्यासाठी शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहायत समितीपुढे प्रस्ताव ठेवले जातात़ चौकशीअंती प्रस्तावांना मंजूरी देण्याचे अधिकार या समितीला असतात़ या समितीमध्ये प्रशासकीय अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींचा देखील समावेश असतो़

Web Title: 27 farmers commit suicide during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे