कोविड केअर सेंटरला २० जंबो ऑक्सिजन सिलिंडर- दोंडाईचा : हस्ती बँकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:07+5:302021-04-12T04:34:07+5:30

दोंडाईचासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. या ...

20 Jumbo Oxygen Cylinders to Covid Care Center - Dondaicha: Hasti Bank Undertaking | कोविड केअर सेंटरला २० जंबो ऑक्सिजन सिलिंडर- दोंडाईचा : हस्ती बँकेचा उपक्रम

कोविड केअर सेंटरला २० जंबो ऑक्सिजन सिलिंडर- दोंडाईचा : हस्ती बँकेचा उपक्रम

googlenewsNext

दोंडाईचासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. या जाणिवेने हस्ती ग्रुपचे अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाने कोविड केअर सेंटरला ३ लाख रुपये किमतीचे २० मोठे सिलिंडर प्रदान करण्यात आले.

शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली होती. त्यानुसार हस्ती बँकेच्या संचालक मंडळाने तातडीने सिलिंडर उपलब्ध करून दिले. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

हस्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी, डॉ. हितेंद्र देशमुख, डॉ. प्रफुल दुग्गड, डॉ. सचिन पारख, पंचायत समितीचे माजी सदस्य मनोहर देवरे यांचा उपस्थितीत कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले. बँकेकडून मागील वर्षीही पंतप्रधान कोविड साहाय्यता निधी व मुख्यमंत्री कोविड साहाय्यता निधीला प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात आले होते, तसेच हस्ती बँकेचे संचालक, सदस्यांमार्फत ३ लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री कोविड साहाय्यता निधीला देण्यात आली होती.

Web Title: 20 Jumbo Oxygen Cylinders to Covid Care Center - Dondaicha: Hasti Bank Undertaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.