१४५ अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 09:24 PM2020-08-07T21:24:43+5:302020-08-07T21:25:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील १४५ रूग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. तसेच पाच रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये धुळे ...

145 reports positive, five patients die | १४५ अहवाल पॉझिटिव्ह, पाच रूग्णांचा मृत्यू

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील १४५ रूग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. तसेच पाच रूग्णांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये धुळे शहरातील सीताराम नगर येथील ५० वर्षीय पुरुष, महिंदळे येथील महिला तसेच शिंदखेडा शहरातील ५५ वर्षीय महिला व तालुक्यातील दोडाईचा येथील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे़
शुक्रवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ५१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. धुळे तालुक्यातील १०, शिरपूर तालुक्यातील ६०, शिंदखेडा तालुक्यातील १७ व साक्री तालुक्यातील सात रूग्णांना बाधा झाली आहे़ जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ४०५२ इतकी झाली आहे.

 

Web Title: 145 reports positive, five patients die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.