धुळे शहरात होणार 12 ओपन जिम

By Admin | Updated: April 25, 2017 16:21 IST2017-04-25T16:21:18+5:302017-04-25T16:21:18+5:30

दोन जिमचे लोकार्पण : सुदृढ आरोग्य संकल्पनेंतर्गत उपक्रम

12 open gyms in Dhule city | धुळे शहरात होणार 12 ओपन जिम

धुळे शहरात होणार 12 ओपन जिम

 धुळे,दि.25- शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राखण्यासाठी शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीष महाले यांच्या संकल्पनेतून शहरात 12 ठिकाणी ओमन जिम साकारण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन जिमचे लोकार्पण रविवारी संध्याकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी व जिल्हासहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. 

पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते लोकार्पणाचा हा कार्यक्रम होणार होता. परंतु त्यांना तातडीने मुंबई येथे जावे लागले. त्यामुळे प्रवेश सोहळा व उर्वरीत 10 जिमचा लोकार्पण सोहळा पुढील मे महिन्यात करण्यात येणार आहे. साक्रीरोडवरील मिशन कंपाऊंड येथील ओपन जिमचे लोकार्पण जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्याहस्ते तर अरुणकुमार वैद्य नगरातील ओपन जिमचे उदघाटन प्रा.शरद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. 
जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या निधीतून एकूण 7 ओपन जिम पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून सतीष महाले यांनी मंजूर करून घेतल्या. आणि प्रभाग क्र. 29 व 33 मध्ये उर्वरीत 5 ओपन जिम स्वखर्चाने करण्यात येणार आहेत. 

Web Title: 12 open gyms in Dhule city