शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कमानींवर ७० लाख़़़ कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 22:25 IST

महापालिका : स्थायी समितीच्या सभेत संतप्त सवाल, विरोध नोंदवून विषय मंजूर

धुळे : शहरात रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे़ रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत़ याच खड्ड्यांनी एका मुलाचा बळी देखील घेतलेला आहे़ जनतेचे हाल होत असताना शहरात स्वागत कमानी कसल्या उभारता? त्यासाठी तब्बल ७० लाख, कशासाठी? असा संतप्त सवाल नगरसेवक संतोष खताळ यांनी उपस्थित केला़ विरोध नोंदवून चर्चेअंती या विषयाला मंजुरी देण्यात आली़ कूपनलिकांच्या दुरुस्तीचे बील काढण्यावरुन देखील सदस्यांनी सुनावल्यानंतर अजेंड्यावरील दोन्ही विषय तहकूब करण्यात आले़महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली़ यावेळी स्थायी समिती सभापती युवराज पाटील, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य, सदस्या आणि विभाग प्रमुख उपस्थित होते़ या सभेत महापालिकेअंतर्गत मोठ्या पुलावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ प्रवेशद्वार उभारणीच्या ७० लाखांच्या खर्चाला आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीच्या सभेत मांडला गेला़ मात्र, स्वागत कमान म्हणजेच प्रवेशद्वार उभारायला नगरसेवक संतोष खताळ यांनी      कडाडून विरोध केला़ धुळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत़ महापालिका खड्डे बुजवित नाही़ अशाच खड्यामुळे मील परिसरात तरुणाचा बळी गेला आहे़ तसेच मुलभूत आणि आवश्यक त्या गोष्टी केल्या जात नाही़ ७० लाखांऐवजी ७ कोटी, ७० कोटी खर्च करा़ मात्र, त्याचा खरा उपयोग नागरीकांना झाला पाहीजे़ तर त्या निधीचा अर्थ आहे़ जनतेच्या उपयोगी येतील अशी कामे प्रामुख्याने झाली पाहीजे, असे सांगत नगरसेवक संतोष खताळ यांनी विरोध दर्शविला़ तर नगरसेवक अमिन पटेल यांनी शहरात अनेक विकासाची कामे पडलेली आहेत़ रस्ते नाहीत, आधी ती करावीत़ असे सांगत हा विषय तहकूब करावा अशी मागणी केली़ या अनुषंगाने नगरसेवक नागसेन बोरसे यांनी प्रवेशद्वार उभारणीच्या विषयाच्या अनुषंगाने स्वागत कमान ही सुंदर कल्पना आहे़ बाहेरुन गावात प्रवेश करणाºयांना धुळ्याची सुंदरता लक्षात येईल़ अर्थ संकल्पात या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे़ केवळ प्रशासकीय मंजुरीसाठी हा विषय स्थायी समितीसमोर आलेला आहे़ त्यामुळे विरोध न करता हा विषय मंजूर होऊ द्यावा अशी मागणी त्यांनी केली़ यानंतर विरोधकांचा विरोध नोंदवून विषयाला मंजूरी देण्यात आली़ बोअरिंगची कामे कोणत्या गावात झाली आहेत? त्याची माहिती प्रशासनाने द्यावी़ वरखेडी गावात गेल्या सहा महिन्यांपासून हातपंप बंद पडलेले आहेत़ त्याची तक्रार देखील केलेली आहे़ मात्र, त्या तक्रारीची दखल घेऊन काम झालेले नाही़ मग काम नेमके कुठे झाले? वलवाडी, अवधान गावात बोअरिंगची कामे झालेली नाही़ मग, नेमके काम झाले कुठे? तसेच चितोड गावात एकही बोअरिंग सुरु नाही़ परिणामी विषय तहकूब करावा अशी मागणी नगरसेवक संजय भील, संतोष खताळ यांनी केली़ त्यामुळे दोन्ही विषय   तहकूब करण्यात आले़ अर्धातास उशीरस्थायी समितीची सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती़ पण, हीच सभा सकाळी साडेअकरा वाजेला सुरुवात झाली़ तोपर्यंत सदस्यांसह अधिकारी सभागृहात उपस्थित होते़ त्यानंतर अर्धातासातच सभेचे कामकाज गुंडाळण्यात आले़ 

टॅग्स :Dhuleधुळे