शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात कॅशिअरला मारहाण करीत 1 लाख 80 हजार लुटले

By admin | Updated: July 1, 2017 13:03 IST

एका कंपनीच्या कॅशिअरला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली व त्यांच्याकडील रोख 1 लाख 80 हजार रुपये लुटून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली़

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.1 - शहरानजीक अवधान औद्योगिक वसाहतीतील बँक शाखेत भरणा करण्यासाठी जाणा:या एका कंपनीच्या कॅशिअरला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली व त्यांच्याकडील रोख 1 लाख 80 हजार रुपये लुटून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी अज्ञात तीन जणांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े भरदिवसा घडलेल्या या जबरी लुटीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आह़े 
भिला हिलाल पाटील (रा़  5 अ पाटकरनगर, नगावबारी चौफुलीजवळ, देवपूर, धुळे) हे अवधान येथील सेवा ऑटोमोटिव्ह प्रा़लि.मध्ये कॅशिअर म्हणून नोकरीला आहेत़ ते शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कंपनीतील पैसे ताडपत्रीच्या बॅगेत ठेवून भरणा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अवधान येथील शाखेत दुचाकीने जात होत़े तेव्हा अग्रसेन इंड्रस्टीजसमोर रस्त्याच्या कडेला उभा एक जिन्स व पिवळा टी-शर्ट घातलेला इसम आपल्याकडे येत असल्याचे पाहून त्याला ठोस लागेन म्हणून पाटील यांनी दुचाकी हळू केली़ त्याचवेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला बाभळाच्या झाडजवळ पांढरा शर्ट घातलेल्या इसमाने जोरात येऊन लाकडी दांडक्याने भिला पाटील यांच्या डोक्यावर वार केला़ 
मार लागल्याने दुचाकी उभी करीत असताना ते खाली पडल़े तेवढय़ात त्या दोघी इसमासह आणखी एक  अनोळखी इसमाने त्यांच्या दुचाकीच्या हॅन्डलला टांगलेली पैशांची बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला़, त्याला भिला पाटील यांनी प्रतिकार केला़ तेव्हा तिघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैशांची बॅग  जबरीने हिसकावून थोडय़ा अंतरावर उभ्या दुचाकीवर बसून पसार झाल़े बॅगेत रोख 1 लाख 80 हजार रुपये होत़े 
याप्रकरणी भिला पाटील यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 25 ते 30 वयोगटातील अज्ञात 3 इसमांविरुद्ध भादंवि कलम 394़ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपनिरीक्षक एस़ ज़े राजपूत करीत आहेत़