शासनाचे आदेश आल्यानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांत अकरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे नियोजन आखले होते. पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण आणि पाणीपुरवठा विभागातील पात्र अधिकारी, कर्मचारी यांच्या बदली प्रक्रियेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार होती; मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता कोविडच्या बैठकीत अडकून पडले. दुपारनंतर सीईओ गुप्ता आल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीकाळ ताटकळत थांबावे लागले. प्रक्रिया उशिरा सुरू झाली. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंतही बदल्या सुरूच होत्या. यानंतरही काही डिपार्टमेंट बाकी होते. त्यामुळे ही प्रक्रिया रात्री ११ ते १२ पर्यंत चालेल, असे सूत्रांनी सांगितले.
कोट....
बदली प्रक्रियेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार होती; मात्र मला कोविड संबंधीच्या बैठकीला हजर राहावे लागले. त्यामुळे प्रक्रिया उशिरा सुरू झाली. त्यामुळे प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली.
- राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद.