शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

येडशीत विद्यार्थ्यांची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

येडशी : येथे छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त शिवाज्ञा प्रतिष्ठान व गजानन नलावडे यांच्या वतीने ...

येडशी : येथे छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त शिवाज्ञा प्रतिष्ठान व गजानन नलावडे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वेदश्री सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात दोनशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, उस्मानाबाद सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन काळे, अभय वाघोलीकर, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सचिव योगेश थोरबोले, पोलीस अधिकारी बेलापुरे, अमोल निरफळ, सुरेंद्र खटके, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक जनकबेंद्रे, संतोष मुळे, चंद्रकांत नलावडे, योगेश उपळकर, भाजप तालुका युवामोर्चा अध्यक्ष गजानन नलावडे, उपसरपंच सुधीर सस्ते, ग्रा.पं. सदस्य चंदन नलावडे, बालाजी देशमुख, किरण नखाते, अनिल कोरे, तानाजी जाधव, महेश पवार, संग्राम इंगळे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कवडे, स्वराज सेना अध्यक्ष विशाल लोमटे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

मुटले, सूर्यवंशी यांची निवड बिनविरोध

(फोटो : गुणवंत जाधवर १४)

उमरगा : तालुक्यातील दाबका ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कुसूम मुटले, तर उपसरपंचपदी गोविंद सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनल व गैबी साहेब ग्रामविकास पॅनलमध्ये लढत झाली. यात जय हनुमान पॅनलला ३ तर गैबी साहेब ग्रामविकास पॅनलला ३ जागा प्राप्त झाल्या होत्या. गोविंद कांबळे हे बिनविरोध निवडून आले होते. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण हे ओबीसी महिला प्रवर्गाला आरक्षित झाले होते. यामुळे जयहनुमान पॅनलच्या कुसूम मुटले यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. उपसरपंचपदी माजी सैनिक गोविंद सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ॲड.गोविंद गायकवाड, प्रा.डॉ.शौकत पटेल, गजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते गोविंद सूर्यवंशी, सरिता पवार, महेश भोसले, गोविंद कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

पाण्याच्या वापराबाबत प्रभातफेरीद्वारे जनजागृती

(फोटो : गुणवंत जाधवर १४)

उमरगा : तालुक्यातील बोरी येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने ‘कॅच द रेन’ उपक्रमांतर्गत महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, तसेच गावातून प्रभातफेरी काढून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ याबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास ॲड.शीतल चव्हाण, श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर औरादे, वजीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेत मेनका इंगळे यांनी प्रथम, मीना लवटे द्वितीय आणि दीक्षा ढाले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सूत्रसंचालन प्रभावती महाजन यांनी केले तर आभार अश्विनी इंगळे यांनी मानले. प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी केले. कार्यक्रमासाठी पुष्पा पाटील, जयश्री पवार, कविता माने, छाया इंगळे, उषा पाटील आदींनी परिश्रम घेतले.

पोहनेरमध्ये धावारे, शेख यांची वर्णी

(फोटो : पोहनेर ग्रामपंचायत १४)

उस्मानाबाद : तालुक्यातील बिनविरोध निघालेल्या पोहनेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उपासना जयदेव धावारे तर उपसरपंचपदी खाजाबी सरताज शेख यांनी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला. निरीक्षक म्हणून नाईकवाडी उपस्थित होते. त्यांना ग्रामसेवक गरड यांनी सहकार्य केले. यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्य याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य हरी धावारे, दयानंद सारफळे, अंगद धावारे, जयदीप देशमुख, मीनाताई घोलकर, चौरे, क्षीरसागर यांच्यासह सरताज शेख, गोविंद सारफळे, सुभान सय्यद, उमेश हुलवणे, मेसा आडगळे, श्रीकांत सोनवणे, माणिक बनसोडे आदी उपस्थित होते.

विधि महाविद्यालयात व्याख्यान

(फोटो : आरपी कॉलेज १४)

उस्मानाबाद : येथील शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात विधि क्षेत्रात गेल्यानंतर, न्यायालयातील दस्तऐवजाची ओळख व्हावी व न्यायालयीन व्यवहार कळावा यासाठी ‘न्यायालयातील दस्तऐवजाची ओळख’ या विषयावर उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील जे.एन. देशमुख यांचे व्याख्यान पार पडले. अध्यक्षस्थानी डाॅ.व्ही.जे. शिंदे होते. यावेळी ॲड.धीरज कोल्हे, ॲड.बारकुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डाॅ.कोल्हे यांनी केले होते.

यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित.

सरपंचपदी निवडीबद्दल फाळके यांचा सत्कार

(फोटो : बाबू खामकर १४)

पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड येथील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी चंद्रकला शिवाजी फाळके यांची निवड झाल्याबद्दल, भारतीय मराठा महासंघ व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तालुका उपप्रमुख प्रज्ञा उमेश दुरुंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अश्विनी गणेश फाळके, जयश्री श्रीराम फाळके, जनाबाई मारुती फाळके, बबन मनोहर फाळके, मनिषा शिवाजी टाळके, साक्षी विलास भसाड, सोनाली अमोल फाळके, सानिका कुंडलिक भसाड, सुशीला दत्तात्रय फाळके, धनश्री फाळके आदी उपस्थित होते.