शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हक्कभंग! शेतकऱ्यांसाठी बोलताना खासदार निंबाळकरांचा फोन पोलीस निरीक्षकांनी बंद केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:00 IST

४ मिनिटांत ५ वेळा कॉल, तरी उत्तर नाही! पोलीस निरीक्षक कानगुडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा खासदारांचा आरोप

- संतोष वीरभूम (धाराशिव): शेतकऱ्यांवरील गुन्हे आणि कर्जमाफीच्या मागणीवर चर्चा करताना भूम पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोन बंद केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत पोलीस निरीक्षक कानगुडे यांना लेखी पत्र देऊन सविस्तर खुलासा मागितला आहे.

भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सातबारा कोरा करून नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी अष्टवाडी येथील सतीश महाराज कदम उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, विजयसिंह थोरात यांच्यासह ७० ते ८० शेतकऱ्यांनी सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मंगळवारी या दोन माजी नगराध्यक्ष व आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला.

४ मिनिटांत ५ वेळा संपर्क, तरी प्रतिसाद नाही!गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शेतकऱ्यांशी चर्चा करत असतानाच त्यांनी पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांना फोन केला. खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहिल्यांदा संपर्क साधला असता कानगुडे यांनी कॉल बंद केला. यानंतर सायंकाळी ४.५७ वाजल्यापासून ५.०४ वाजेपर्यंत त्यांनी वारंवार (४.५७, ५.०२, ५.०३ आणि ५.०४ वाजता) फोन केले. तर एका कॉलवर बोलत असतानाच पोलीस निरीक्षकांनी फोन कट केला. तसेच वारंवार फोन न उचलल्याने खासदारांनी 'Please Recive Call Mp Om Rajenimbalkar' (५.०२ वाजता) आणि नंतर 'Please Call Me Mp Om Rajenimbalkar' (६.०७ वाजता) असे मेसेजही केले. परंतु, कोणत्याही मेसेजला किंवा कॉलला पोलीस निरीक्षकांनी प्रतिसाद दिला नाही.

खासदारांचा थेट 'हक्कभंग'चा आरोपपोलीस निरीक्षकाच्या या वर्तनावर संताप व्यक्त करत खासदार निंबाळकर यांनी कानगुडे यांना पत्र दिले आहे. पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, "आपण एक जबाबदार अधिकारी असूनही कर्तव्य बजावत असताना लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे. मी धाराशिव लोकसभेचा सदस्य असल्याने त्यांनी (पोलीस निरीक्षकांनी) लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्यामुळे माझ्या अधिकार व हक्कांचा भंग झाल्याची भावना झाली आहे." यामुळे आता श्रीगणेश कानगुडे यावर काय खुलासा देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांवरील गुन्ह्यांपेक्षा आता पोलीस निरीक्षक विरुद्ध खासदार असा हा संघर्ष अधिक चर्चेत आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Privilege breach: MP's call cut while speaking for farmers.

Web Summary : MP Nimbalkar accuses police inspector Kanagude of ignoring calls regarding farmer issues. Farmers protested crop loss and loan waivers. Nimbalkar alleges breach of privilege after Kanagude repeatedly cut calls and ignored messages. He demands an explanation.
टॅग्स :omraje nimbalkarओमराजे निंबाळकरFarmerशेतकरीdharashivधाराशिवPoliceपोलिस