आज ५८ केंद्रावर मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST2021-07-23T04:20:27+5:302021-07-23T04:20:27+5:30

उस्मानाबाद : कोरोना बाधितांची संख्या घटू लागली आहे. मात्र कोरोनाचा पूर्णत धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक ...

Vaccines will be available at 58 centers today | आज ५८ केंद्रावर मिळणार लस

आज ५८ केंद्रावर मिळणार लस

उस्मानाबाद : कोरोना बाधितांची संख्या घटू लागली आहे. मात्र कोरोनाचा पूर्णत धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी लसीकरणासाठी ५८ केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ४६ केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध असेल.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. रुग्ण घटत असले तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता नागरिक कोरोना प्रतिबंधत्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाकडून ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ५८ केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. १२ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस घेता येईल. ४६ केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळेल. सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान लसीकरण मोहीम सुरू राहिल.

या केंद्रांवर मिळेल कोव्हॅक्सिन

मुरुम, सास्तूर, लोहारा, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालय, कळंब, तुळजापूर, उमरगा, परंडा उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या केंद्रावर कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असणार आहे.

येथे मिळेल कोविशिल्डचा दुसरा डोस

आज जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे प्रत्येकी एका उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, खामगाव, काजळा, बामणी, तावरजखेडा, बोरखेडा, पाटोदा, चिलवडी, सारोळा, शिंगोली.

तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी, हंगरगा नळ, खडकी, तिर्थ खुर्द, होर्टी, देवसिंगा तू, माळुंब्रा.

उमरगा तालुक्यातील केसरजवळगा, औराद, माळगी, एकुर्गा, डाळिंब,

कळंब तालुक्यातील दहिफळ, वाकडी केज, गौरगाव, बाेर्डा, पिंपरी शि.

भूम तालुक्यातील आंबी, पखरुड, आरसोली, दुधोडी, ईडा,

परंडा तालुक्यातील कुकडगाव, लोणी, खासापुरी, चिंचपूर बुद्रूक या ठिकाणी लस मिळेल.

उस्मानाबाद शहरातील वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर डोस घेता येणार आहे.

Web Title: Vaccines will be available at 58 centers today