उमरगेकरांनी निभावले रक्ताचे नाते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:06+5:302021-07-14T04:38:06+5:30
उमरगा : ‘लोकमत’ समूहाच्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूृजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या ...

उमरगेकरांनी निभावले रक्ताचे नाते...
उमरगा : ‘लोकमत’ समूहाच्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूृजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञात सोमवारी उमरगेकरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध वयोगटातील नागरिकांनी यात रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हीच बाब लक्षात घेऊन ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’च्या वतीने ठिकठिकाणी ‘लोकमत रक्ताचं नातं’ याअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सोमवारी उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात १११ रक्तदात्यांनी रक्तदान सहभाग नोंदवित रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला मोरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद चौधरी, शांतिदूत परिवाराच्या अध्यक्षा विद्याताई जाधव, डॉ. संजय अस्वले, मल्लिनाथ मलंग, नोडल कोविड ऑफिसर डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. उदय मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत मोरे, प्राचार्य डॉ. डी. आर. कुलकर्णी, कृषी अधिकारी सुनील जाधव, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, अजित गोबरे, कविराज रेड्डी, रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. पंडित बुटूकने, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा कविता अस्वले, रेखाताई पवार, सुनंदा माने, सरिता उपासे, प्रा. किरण सगर, नगरसेवक महेश मशाळकर, डॉ. सागर पतंगे, प्रा. अभयकुमार हिरास, डॉ. डी. एम. पठाण, प्रा. जीवन जाधव, प्रा. मारुती खमीतकर, गरुड झेप फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश गरुड, विधिज्ञ मंडळाचे सचिव ॲड. एस. पी. इनामदार, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रदीप जाधव, प्रा. डॉ. रवी आळंगे आदींची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉ. जाधव म्हणाले, रक्ताची गरज लक्षात घेऊन कठीण परिस्थितीत ‘लोकमत वृत्तपत्र समूह’ धावून आले आणि एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली. रक्तदान शिबिराचे आयोजन करून खऱ्या अर्थाने लोकमतने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. उमरगा तालुक्यातून नेहमीच मोठ्या प्रमाणात रक्तदान होत आले आहे. त्यामुळे हा तालुका रक्तदानाचा हब होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय अस्वले, प्रास्ताविक ‘लोकमत’ प्रतिनिधी प्रा. गुणवंत जाधवर यांनी केले. आभार जिल्हा प्रतिनिधी चेतन धनुरे यांनी मानले.