घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:34+5:302021-09-21T04:36:34+5:30

परंडा शहरातील एक घर फोडून आतील १ लाख ६ हजार २०० रुपये चोट्यांनी चोरुन नेले होते. याप्रकरणी परंडा पोलीस ...

Two arrested for burglary | घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघे अटक

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघे अटक

परंडा शहरातील एक घर फोडून आतील १ लाख ६ हजार २०० रुपये चोट्यांनी चोरुन नेले होते. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि माने, पोहेकॉ काझी, पोना सय्यद, चव्हाण, पोकॉ कोळी, आरसेवाड, मारलापल्ले यांचे पथक करीत होते. गुन्ह्याच्या शैलीतून हा गुन्हा भूम येथील आरसोली रस्ता परिसरात राहणाऱ्या गणेश व सतीष मच्छिंद्र काळे या दोघा भावांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. २० सप्टेंबर रोजी त्या दोघांस पथकाने ताब्यात घेतले असता नमूद गुन्ह्यातील चोरीच्या रकमेतून दुचाकी खरेदी केल्याचे समोर आले. यावर पथकाने दुचाकी जप्त करुन दोघांना परंडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Two arrested for burglary