काेविड सेंटरमध्ये ४६ काेराेना बाधितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:20+5:302021-04-11T04:32:20+5:30

मुरुम -ः शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान सुरुच आहे. शहरातील संभाजीनगर येथील तीन तर नेहरुनगर येथे एक अशा चार ...

Treatment of 46 carnitine sufferers at Cavid Center | काेविड सेंटरमध्ये ४६ काेराेना बाधितांवर उपचार

काेविड सेंटरमध्ये ४६ काेराेना बाधितांवर उपचार

मुरुम -ः शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान सुरुच आहे. शहरातील संभाजीनगर येथील तीन तर नेहरुनगर येथे एक अशा चार रुग्णांची शुक्रवारी वाढ झाली .त्यामुळे शहराची दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या आता २५ वर पोहचली आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये उमरगा तालुक्यातील ४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत ८७७ नागरीकांना कोविडची लस देण्यात आली आहे. आलूर प्राथमिक रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या केसरजवळगा येथे दोन तर कदेर येथे एक असे तीन रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.

शहरात कोरोनाला रोखण्यासाठी नगरपरिषद ,पोलिस आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीसुद्धा अनेक नागरीक नियम पायदळी तुडवत असल्याने शहाराची रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच आहे. शहरात सुरुवातीला यशवंतनगर भागात ४ मार्च रोजी दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर याच भागात पुन्हा एक रुग्ण आढळला. २२ मार्च नंतर शहराची रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच गेली आहे. शुक्रवारपर्यंत शहराची रुग्ण संख्या २५ वर पोहचली आहे. यामध्ये मुदकण्णा गल्ली दोन, अशोक चौकमध्ये सर्वाधिक चार, नेहरुनगर, संभाजीनगर येथे प्रत्येकी तीन, सोनार गल्ली, सुभाष चौक, भीमनगर प्रत्येकी दोन, झुरळे गल्ली, धनगर गल्ली, शास्त्रीनगर, मेनरोड, नगर परिषद येथे प्रत्येकी एक असे २५ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुरुम शहरात एक तर केसरजवळगा येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यसरकारकडून शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने दिवसभर बंद असल्याने शनिवारी शहरातील रस्ते ओस पडले होते.

मुरुम कोविड सेंटरमध्ये सध्या उमरगा तालुक्यातील ४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात शहरातील १२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत मुरुम ग्रामीण रुग्णालयात ८७७ नागरीकांना कोविड प्रतिबंधित लस देण्यात आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी शासनाचे नियम कडकपणे पाळून कोरोनापासून वाचण्यासाठी स्वःतासह कुटूंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.

-डॉ.वसंत बाबरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुरूम

Web Title: Treatment of 46 carnitine sufferers at Cavid Center