प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:24+5:302021-02-08T04:28:24+5:30
वाशी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कर्मवीर प्रज्ञाशोध परीक्षेत ...

प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश
वाशी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कर्मवीर प्रज्ञाशोध परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालयातील संस्कार ढेकणे, श्रेया सावंत, अक्षय सावंत या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी व्ही. एस. पाटील, पी. टी. पाटील, दिलीप रेवडकर, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, गटशिक्षणाधिकारी शेखर सावंत, सदस्य व. न. इंगळे, पी. एल. पाटील, टी. पी. शिनगारे, एस. के. मोरे, सी. एस. मोरे यांच्या हस्ते या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक दत्तात्रय कोकाटे, शालेय समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, विशाल महामुनी, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, आदींनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.