उस्मानाबादेत जाधवांचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST2021-07-07T04:39:59+5:302021-07-07T04:39:59+5:30

भाजपचे आंदाेलन; १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी उस्मानाबाद : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ...

A statue of Jadhav was burnt in Osmanabad | उस्मानाबादेत जाधवांचा पुतळा जाळला

उस्मानाबादेत जाधवांचा पुतळा जाळला

भाजपचे आंदाेलन; १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

उस्मानाबाद : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईचा निषेध नाेंदवित भाजपच्या वतीने उस्मानाबाद शहरामध्ये तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचा पुतळा जाळण्यात आला. या वेळी सरकारविराेधी घाेषणा देत कारवाई मागे घेण्याची मागणीही करण्यात आली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गाेंधळ झाला. यानंतर तालिका अध्यक्ष जाधव यांनी भाजपच्या आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आराेप करीत त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही स्वरूपाची शिवीगाळ झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही भाजपच्या १२ आमदारांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आराेप करीत उस्मानाबाद भाजपच्या वतीने मंगळवारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या पुतळ्याला जाेडे मारून दहन करण्यात आले. या वेळी राज्य सरकारच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करीत आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, भास्कर जाधव यांची चाैकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या. हे आंदाेलन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या वेळी भाजपचे पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

चाैकट...

तालिका अध्यक्षांची चाैकशी करा

राज्याचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तालिका अध्यक्षांना कुठल्याही स्वरूपाची शिवीगाळ झाली नाही, असे स्पष्ट केले आहे. असे असतानाही १२ आमदारांना निलंबित केले आहे. ही कारवाई मागे घेऊन तालिका अध्यक्षांची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केली.

Web Title: A statue of Jadhav was burnt in Osmanabad