शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

सोयबा सिध्दीकीची राष्ट्रीय स्पर्धेत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : राष्ट्रीय रायफल शूटिंग असोसिएशनच्या वतीने अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित आठव्या वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उस्मानाबादच्या ...

उस्मानाबाद : राष्ट्रीय रायफल शूटिंग असोसिएशनच्या वतीने अहमदाबाद (गुजरात) येथे आयोजित आठव्या वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उस्मानाबादच्या सोयबा तौफिक सिद्दीकी हिने चमकदार कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला. तिची ऑक्टोबर २०२१ मध्ये इंदौर येथे होणाऱ्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहचणारी सोयबा सिद्दीकी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे.

या स्पर्धेत ९८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र रायफल असोसिएशन, मुंबईच्या संघामधून उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट रायफल असोसिएशनची खेळाडू सोयबा सिद्दीकी हिने पाचवा क्रमांक पटकावत नेमबाजीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे. या यशाबद्दल उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट रायफल असोसिएशनचे अध्यक्ष व कोच अजीम शेख, सचिव शाहीन शेख, कोषाध्यक्ष फेरोज पल्ला, सदस्य तौफीक सिद्दीकी, राकेश पवार, आकाश मोरे, मयूर दुरूडकर, चेतन सपकाळ यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिकांनी तिचे कौतुक केले.

चौकट.........

विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक

उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट रायफल असोसिएशनची सोयबा सिद्दीकी ही अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. वडील तौफीक सिद्दीकी हे शेती करून कुटुंब चालवितात. आपल्या मुलांनी कुटुंबाचे नाव उंचावले पाहिजे म्हणून त्यांनी सोयबा हिस प्रोत्साहन दिले. सोयबा हिने रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात आवड दर्शविल्याने तिला तौफीक सिद्दीकी यांनी संपूर्ण पाठबळ दिले. दीड वर्षापूर्वी लातूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत पाऊल ठेवले होते. आता रायफल शूटिंगसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत धडक घेणारी उस्मानाबादसारख्या भागातली ती पहिली खेळाडू ठरली आहे.