शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

तेर येथील दुकान फाेडले, आरणी शिवारातून म्हैस लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

उस्मानाबाद - शहरासाेबतच ग्रामीण भागातही चाेरटे धुमाकूळ घालत आहेत. २० ते २१ ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चाेरट्यांनी आळणी शिवारातील ...

उस्मानाबाद - शहरासाेबतच ग्रामीण भागातही चाेरटे धुमाकूळ घालत आहेत. २० ते २१ ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चाेरट्यांनी आळणी शिवारातील गाेठ्यात बांधलेली म्हैस लंपास केली. तसेच तेर येथील माेटार रिवाइंडिंगचे दुकान फाेडले; तर उस्मानाबाद शहरातील घरासमाेर उभी केलेली दुचाकीही अज्ञाताने पळविली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध ढाेकी तसेच आनंदनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील आरणी शिवारातील गाेठ्यात संजय लक्ष्मण घाेरपडे यांनी आपली म्हैस बांधली हाेती. गाेठ्यात काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने २० ऑगस्टच्या रात्री साधारणपणे साडेअकराच्या सुमारास सदरील म्हैस चाेरून नेली. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. यानंतर घाेरपडे यांनी सर्वत्र शाेध घेतला. परंतु, म्हैस सापडली नाही. त्यामुळे त्यांनी ढाेकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना तेर येथे घडली. वाघाेली येथील शेषेराव भीमराव खडके यांचे विद्युत माेटार रिवाइंडिंगचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी गेले असता, अज्ञाताने दुकानाचा पत्रा उचकटून आत प्रवेश मिळविला. यानंतर आतील साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा एक, पाच अश्वशक्ती क्षमतेचा एक, तीन अश्वशक्ती क्षमतेच्या एका पंपासह तांबे वायर एक किलाे लंपास केली. चाेरीची ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर त्यांनी ढाेकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना उस्मानाबाद शहरात घडली. लाेणी राेड परिसरातील अविनाश सुभाष राठाेड यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी केली हाेती. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत चोरट्याने सदरील दुचाकी लंपास केली. ही घटना १९ ऑगस्ट राेजी घडली. यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शाेध घेतला. परंतु, ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.