रस्ता, नालीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:58+5:302021-02-24T04:33:58+5:30

वृद्धाश्रमासाठी किराणा साहित्य ईट : येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने नळीवडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळाच्या वतीने चालविण्यात ...

Road, drain work started | रस्ता, नालीचे काम सुरू

रस्ता, नालीचे काम सुरू

वृद्धाश्रमासाठी किराणा साहित्य

ईट : येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने नळीवडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या वृद्धाश्रमासाठी किराणा साहित्याची मदत करून बाकडेही भेट देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे शुभम हाडगे, साहील पठाण, नेहाल पठाण, सौरभ देशमुख, अभिजित माने, योगेश देशमुख, प्रसाद माने, आकाश बोदार्डे, ओमराजे देशमुख, निखिल देशमुख आदी उपस्थित होते.

हमीभाव खरेदी केंद्र मंजूर

ईट : येथे हरभरा खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. तनुजा महिला शेतीपूरक सेवा पुरवठा संस्थेला हे केंद्र मिळाले असून, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह ईट येथील केंद्रावर टी. यू. सोन्ने व उमेश सोन्ने यांच्याकडे ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Road, drain work started