‘आविष्कार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST2021-07-15T04:23:09+5:302021-07-15T04:23:09+5:30

उमरगा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या 'आविष्कार' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डाॅ. दिलीप गरूड यांच्याहस्ते व शिक्षण ...

Publication of the collection of poems 'Avishkar' | ‘आविष्कार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

‘आविष्कार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

उमरगा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या 'आविष्कार' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डाॅ. दिलीप गरूड यांच्याहस्ते व शिक्षण विस्ताराधिकारी राजेंद्र कानडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याप्रसंगी पुस्तकाचे संपादक सुभाष वैरागकर यांनी पुस्तक संपादित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमास साहित्यिक प्रमोद माने, साहित्यिक हणमंत पडवळ, मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा. किरण सगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन पुष्पलता पांढरे यांनी केले, तर आभार प्रवीण स्वामी यांनी मानले. याप्रसंगी मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदा शाखेच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बालाजी इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिलीप चौधरी, शाम नवले, कमलाकर मोटे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सुधीर कांबळे, सरिता उपासे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रघुवीर आरणे, नागनाथ बदोले, अयोध्या चिगुरे, धनराज तेलंग, संजय रूपाजी, सदानंद कुंभार, दयानंद पाटील आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बालाजी भोसले यांनी केले.

Web Title: Publication of the collection of poems 'Avishkar'