‘मसाप’च्या वतीने कवयित्री केसकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:40+5:302021-07-07T04:40:40+5:30

उस्मानाबाद : गुजरातमधील बडोद्याच्या मराठी वाङ्‌मय परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘अखिल भारतीय अभिरुची साहित्य गौरव पुरस्कार’ येथील कवयित्री भाग्यश्री ...

Poet Keskar felicitated on behalf of 'MASAP' | ‘मसाप’च्या वतीने कवयित्री केसकर यांचा सत्कार

‘मसाप’च्या वतीने कवयित्री केसकर यांचा सत्कार

उस्मानाबाद : गुजरातमधील बडोद्याच्या मराठी वाङ्‌मय परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘अखिल भारतीय अभिरुची साहित्य गौरव पुरस्कार’ येथील कवयित्री भाग्यश्री रवींद्र केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने कवयित्री केसकर यांचा सत्कार करण्यात आला. गतवर्षी मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशन संस्थेच्या वतीने कवयित्री भाग्यश्री केसकर यांचा ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला होता. केसकर यांच्या कवितासंग्रहास यापूर्वी महात्मा जोतिबा फुले स्मृती साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार, डॉ. बाबासाहेब अकॅडमीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. यंदा हा तिसरा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने कवयित्री भाग्यश्री केसकर यांचा अध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे व कार्यकारी सदस्य राजेंद्र अत्रे यांनी सत्कार केला.

Web Title: Poet Keskar felicitated on behalf of 'MASAP'