कवी कालिदास जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:14+5:302021-07-12T04:21:14+5:30

उस्मानाबाद : येथील आर्य चाणक्य विद्यालयात कवी कालिदास जयंती व संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप विधी प्रकोष्ठ ...

Poet Kalidas Jayanti Celebration | कवी कालिदास जयंती साजरी

कवी कालिदास जयंती साजरी

उस्मानाबाद : येथील आर्य चाणक्य विद्यालयात कवी कालिदास जयंती व संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप विधी प्रकोष्ठ विभागाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय संघटनमंत्री शेषाद्री डांगे, लोकसेवा समितीचे सचिव कमलाकर पाटील, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे डॉ. अभय शहापूरकर, मुख्याध्यापक डॉ. मनीष देशपांडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुलभा देशमाने आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. पाटील म्हणाले, आर्य चाणक्य विद्यालय मागील २५ वर्षात शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे वेगळ्या उंचीवर पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळेत विद्यार्थ्यांना संशोधनात्मक कार्य करण्याची संधी मिळाली असून अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शाळेत विशेष प्रयत्न केले जातात. यावेळी विद्यार्थी सुदर्शन डांगे, गणेश पाटील आदी विद्यार्थी, पालकांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख बक्षिसांची रक्कम देणाऱ्या गोपाळ व्यास, शरदराव देगावकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बाबासाहेब जगताप यांनी केले. मुळे यांनी आभार मानले.

Web Title: Poet Kalidas Jayanti Celebration