शाळा परिसरात केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:11+5:302021-07-08T04:22:11+5:30

निवडीबद्दल सत्कार उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील मांडवा येथील सरपंच डॉ. योगिनी देशमुख यांची राष्ट्रीय सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड ...

Plantation done on school premises | शाळा परिसरात केले वृक्षारोपण

शाळा परिसरात केले वृक्षारोपण

निवडीबद्दल सत्कार

उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील मांडवा येथील सरपंच डॉ. योगिनी देशमुख यांची राष्ट्रीय सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सरपंचांच्या संघटनांवर आपण भर देणार असल्याचे देशमुख म्हणाल्या.

२०९ जणांना लस

उस्मानाबाद : तालुक्यातील पळसप येथे ४५ वर्षांवरील २०९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा रोकडे, डॉ. दीपक ढेकरे, उपसरपंच राम लाकाळ, ग्रामपंचायत सदस्य मंगेश माळी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती माळी, लाकाळ, मगर, पटेल आदी हजर होते.

रस्त्यांची दुरवस्था

तुळजापूर : शहरातील हद्दवाढ भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर येथील रहिवाशांना चिखल आणि डबक्यांतून रस्ता शोधावा लागला. सात वर्षांनंतरही या भागात पक्के रस्ते झाले नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सुहास साळुंके यांचा सत्कार

तुळजापूर : भाजपाचे सुहास साळुंके यांची जय भवानी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली. याबद्दल नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय कंदले, चंद्रकांत कणे, किशोर साठे, माऊली भोसले, नागेश नाईक, डॉ. आनंद मुळे, प्रदीप अमृतराव आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation done on school premises