शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या ‘त्या’ भागात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST

कळंब : कळंब शहरातील चिकन सेंटरचे वेस्टेज, केशकर्तनालयातील केस, कचरा यामुळे ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या कळंब येडशी रोडवरील त्या ‘स्पॉट’ ...

कळंब : कळंब शहरातील चिकन सेंटरचे वेस्टेज, केशकर्तनालयातील केस, कचरा यामुळे ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलेल्या कळंब येडशी रोडवरील त्या ‘स्पॉट’ वर आता लोकवर्गणीतून मुरूम अस्तरीकरण आणि वृक्षारोपण करण्यात आले आहे. सजग नागरिकांच्या या कृतीने ‘उकिरड्याची दैना फिटली’ याचीच अनुभूती येत आहे. कळंब शहरातील येडशी रोडवर वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना कळंब नगर परिषद, डिकसळ व तांदूळवाडी ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका बसत होता. कळंब शहरातील चिकन सेंटर चालक आपले वेस्टेज याच रस्त्यावर आणून टाकत होते. केशकर्तनालयातील केस टाकण्याची ही हक्काची जागा बनली होती. याशिवाय घरातील कचरा, टाकाऊ कपडे, मृत जनावरे टाकले जात असल्याने शहरालगतचा हा परिसर ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनला होता. असे असतानाही तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्था याकडे लक्ष देत नव्हत्या. अखेर आपल्याला जाणवत असलेली समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेतला होता. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. तद्नंतर त्यांच्या सूचनेनुसार नागरिक व बांधकाम विभागाने स्वच्छता मोहीम राबवली, तर पुढे स्थानिक नागरिक, हेल्थ ग्रुपचे सदस्य यांनी पुढाकार घेत याठिकाणी सुशोभीकरण, वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार लोकवर्गणी करून अस्वच्छता दूर करून मुरूम अस्तरीकरण भराव मजबूत केला आहे.

याठिकाणी प्रभारी तहसीलदार प्रथमेश भुरके, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि कुमार दराडे, अग्रोजेनिक्सचे संचालक रवी नरहिरे, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ता पवार, आयटीआयचे रवीचंद्र जगदाळे आदींच्या हस्ते कडूनिंब व वटवृक्षाची लागवड करण्यात आली. या लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्यात येणार आहे.

यांनी घेतला पुढाकार

ग्रामीण भागात एखाद्या अस्वच्छ परिसराचा कायापालट झाल्यास ‘उकिरड्याची दैना फिटली’ असे संबोधले जाते. कळंब शहरातील येडशी रोडवरील ‘डम्पिंग ग्राऊंड’ झालेल्या भागाला स्थानिक नागरिकांनी एकत्र येत अशीच ऊर्जितावस्था आणली आहे. त्यासाठी अशोक डिकले, बापू भंडारे, वैभव कोठावळे, श्रीकांत डिकले, डॉ. पुरुषोत्तम पाटील, बाबा काळे, बाळासाहेब कांबळे, विष्णू मस्के, भाऊसाहेब देशमुख, प्रवीण मडके, विकास भंडारे, सुहास धाबेकर, शिवाजी जगताप, प्रमोद नरहिरे, पप्पू मडके, प्रशांत निन्हाळ, जुबेर पठाण, धैर्यशील मडके आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बापू भंडारे यांनी केले, तर आभार अशोक डिकले यांनी मानले.

190921\0446img-20210919-wa0053.jpg

कळंब फोटो