मनाई आदेश झुगारून पानटपरी सुरू ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST2021-07-15T04:23:04+5:302021-07-15T04:23:04+5:30

धाेकादायकरीत्या मालवाहतूक, गुन्हा दाखल उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील लाेहटा (प.) येथील गाेरख विठ्ठल काेळी हे १३ जुलै राेजी आपल्या ...

Pantpari continued with a restraining order | मनाई आदेश झुगारून पानटपरी सुरू ठेवली

मनाई आदेश झुगारून पानटपरी सुरू ठेवली

धाेकादायकरीत्या मालवाहतूक, गुन्हा दाखल

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील लाेहटा (प.) येथील गाेरख विठ्ठल काेळी हे १३ जुलै राेजी आपल्या ताब्यातील वाहनातून (क्र. एमएच. २४-जे.७७१४) धाेकादायकरीत्या लाेखंडी गज घेऊन जात हाेते. या माध्यमातून त्यांनी रहदारीस धाेका निर्माण केला. या प्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक काेळी यांच्याविरुद्ध कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

३० वर्षीय महिलेवर अत्याचार

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना १३ जुलैच्या रात्री २ वाजता घडली. घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पीडित महिलेने नजीकचे पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Pantpari continued with a restraining order