१५व्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:42+5:302021-07-07T04:40:42+5:30

भूम : १५व्या वित्त आयोगातून पथदिव्यांचे वीजबिल भरण्यास विरोध दर्शवित यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ...

Opposition to payment of electricity bill from 15th Finance Commission | १५व्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्यास विरोध

१५व्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्यास विरोध

भूम : १५व्या वित्त आयोगातून पथदिव्यांचे वीजबिल भरण्यास विरोध दर्शवित यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपच सघांच्यावतीने उपविभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मंगळवारी महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मेंढे यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यातील सरपंचांनी हे निवेदन दिले. यात ग्राम विकास करण्यासाठी १५वा वित्त आयोग वितरित करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, कोरोना काळात प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांसोबतच प्रत्येक सरपंचाने गावस्तरावर महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. त्यामुळे त्यांनादेखील कोरोना योद्धा म्हणून जाहीर करावे. कोरोना आजाराने मृत्यू झाल्याच्या सरपंचांच्या कुटुंबियांना शासनाने ५० लाख रुपये आर्थिक मदत करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघ जिल्हाध्यक्ष मारूती मेंढे, जिल्हा सरचिटणीस सुधीर क्षीरसागर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रुक्मिणी राऊत, भूम तालुकाध्यक्ष प्रशांत जाधव, वाशी तालुकाध्यक्ष गणेश गपाट, भूम तालुका सचिव कृष्णा मोहिते, धारलिंग नकाते, हिंदुराज गपाट, रंजना पाटील आदी सरपंचांच्या सह्या आहेत.

060721\189-img-20210706-wa0064.jpg

उपविभागीय कार्यालयात निवेदन देताना फोटो

Web Title: Opposition to payment of electricity bill from 15th Finance Commission