लोहारा, उस्मानाबादेत आज रक्तदानाचा महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST2021-07-15T04:23:07+5:302021-07-15T04:23:07+5:30

उस्मानाबाद/लोहारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले. परिणामी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही ...

Mahayagya of blood donation today at Lohara, Osmanabad | लोहारा, उस्मानाबादेत आज रक्तदानाचा महायज्ञ

लोहारा, उस्मानाबादेत आज रक्तदानाचा महायज्ञ

उस्मानाबाद/लोहारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले. परिणामी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही बाब लक्षात घेत ‘लोकमत’च्या वतीने १५ जुलै रोजी उस्मानाबाद व लोहारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटना, शिक्षण संस्था, मित्र मंडळे यांच्यासह मान्यवरांनी केले आहे.

अनेक ठिकाणच्या शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर उपचार करताना अडचणी येत आहेत. या अनुषंगाने ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. लोहारा शहरातील शिबिर सह्याद्री रक्तपेढीच्या सहकार्याने भारतमाता मंदिरात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होत असून, यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची लोक चळवळ उभी करावी असे आवाहन यानिमित्त करण्यात येत आहे. उद्घाटन तहसीलदार संतोष रुईकर, पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, आर्ट ऑफ लिव्हींगचे बालाजी मक्तेदार, विकास होनराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या शिबीरात आर्ट ऑफ लिव्हिंग, कै.भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, जनकल्याण समिती व गया फाऊंडेशन, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, नाभिक संघटना, शिक्षक संघ, शिक्षक समिती, कै.वसंतराव काळे माध्यमिक विद्यालय, ओ.बी.सी. कर्मचारी महासंघ, लोहारा तालुका तेली समाज संघटना, कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, दयानंद गिरी मित्र मंडळ, रमाकांत गायकवाड विचार मंच, तथागत गौतम बुध्द बहुउद्देशीय संस्था कानेगाव, जुनी पेन्शन हक्क संघटना, जिजाऊ ब्रिगेड, बसवेश्वर गणेश मंडळ, लोहारा तालुका डॉक्टर असोशियन, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुउद्देशिय सामजिक संस्था, एजी युवा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, बाल गणेश सेवादल मंडळ, दत्त गणेश मंडळ, विरशैव कक्कय्या गणेश मंडळ, निसर्ग संवर्धन संस्था, टायगर ग्रुप, मिलाफ ग्रुप, शिव मित्र मंडळ, विश्वजन आरोग्य सेवा समिती, तालुका मेडीकल असोशिएशन सहभाग असणार आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार...

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात असलेल्या शासकीय रक्तपेढीतही आज १५ जुलै रोजी रक्तदान शिबीर होत आहे. लोकमत, आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच जिल्हा कारागृह प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेदरम्यान होत आहे. या शिबीरात अन्य इच्छुकांनाही सहभागी होता येणार आहे. रक्तदान करुन चळवळ गतीमान करावी, असे आवाहन जिल्हा कारागृह अधिकारी एकनाथ शिंदे, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सचिन मोकाशे, अविनाश धरणे, शिव गिरी, पंढरीनाथ घोडके यांनी केले आहे.

यांना करता येईल रक्तदान

१८ ते ६० वयोगटातील व्यक्ती

कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.

लसीचा पहीला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.

दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.

Web Title: Mahayagya of blood donation today at Lohara, Osmanabad