शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानाचा महायज्ञ आज कळंबमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : कोराेनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले. परिणामी, रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हा ...

उस्मानाबाद : कोराेनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले. परिणामी, रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हा तुटवडा दूर सारण्याच्या हेतूने ‘लाेकमत’च्या वतीने ७ जुलै रोजी कळंबमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पंचायत समितीच्या सभागृहात हे शिबिर होणार असून, यात सहभागी होण्याचे आवाहन लोकमतसह मान्यवरांनी केले आहे.

जिल्हाभरातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. ७ जुलैला कळंब येथील शिबिराचे सकाळी १०.३० वाजता नगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल. या शिबिरात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

विविध संघटना होणार सहभागी

कळंबमध्ये ७ जुलै रोजी होणाऱ्या लसीकरण शिबिरात आतापर्यंत विविध सामाजिक संघटना, संस्था, समूह यांनी सहभाग नोंदविला आहे. याशिवाय, आता एमएच २५ हेल्पिंग हँड, शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेट परिवार व ॲग्रो इंडस्ट्रीज यांनीही सहभाग नोंदविला आहे. याशिवाय, इतर इच्छुक रक्तदात्यांसाठीही हे शिबिर हे खुले असणार आहे.