शिकाऊ परवान्यासाठी ऑफलाईन परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षार्थीऐवजी तोतया उमेदवार अथवा इतरांमार्फत परीक्षा दिली जात आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया औपचारिकता उरेल, असे काहींचे म्हणणे आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेला किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेला उमेदवार पुढे जाईल व अपघाताला बळी पडेल. असेही आरटीओ कार्यालयात आलेल्या काही उमेदवारांनी सांगितले. शहराच्या ठिकाणी ॲण्ड्राइड मोबाईल चालतो. परंतु, ग्रामीण भागात साधा मोबाईलही चालत नाही. कधी रेंज नसते, तर कधी चार्जिंग झालेला नसतो. शिवाय मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसणे, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे लर्निंग लायसन्स अडवून बसून परीक्षा अर्धवट राहते. नाइलाजाने आरटीओ कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे शासनाने ऑफलाईन लायसन्स काढण्याची सुविधा दिली आहे. परंतु, तांत्रिक बाबींमुळे आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
ऑनलाईनसाठी अडचणी काय
उपप्रादेशिक परिवहन विभागाने कोरोना काळात नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये वाहनचालकांना संगणकीय नेटवर्कचा मोठा खोडा सोडवावा लागत आहे.
अनेकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ओटीपी आलेला नाही. यावेळी अनेकवेळा प्रक्रिया राबविली; मात्र ओटीपी मिळालेला नाही.
मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड क्रमांक लिंक केला नसल्यामुळे ऑनलाईन परीक्षा देता आली नाही.
कोट...
उमेदवारांना घरबसल्या लर्निंग लायसन्स काढता यावा, यासाठी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला. ज्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडायचा नाही. त्यांना आरटीओ कार्यालयात ऑफलाईन पद्धतीनेही लर्निंग लायसन्स काढता येत आहे.
गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
किती लायसन्स दिले
वर्ष लर्निंग पर्मनंट
२०१९ ३८८९६ १२४३४
२०२० ३२२५५ ११४०७
म्हणून आरटीओ कार्यालय गाठले
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली. सर्व्हर प्राॅब्लेमुळे परीक्षा पूर्ण झाली नाही. स्लॉट बुकिंग केल्यामुळे ७ जुलैला पुन्हा आरटीओ कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने लायसन्स काढण्यासाठी यावे लागले. मात्र, यात वेळेसोबतच पैसाही खर्च झाला. ऑनलाईन पद्धतीत अडचणी दूर कराव्यात.
सुनील चव्हाण, दाळिंब
ऑनलाईन परीक्षेसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी लिंक असले तरच परीक्षेसाठी पासवर्ड पडतो. अन्यथा परीक्षा देता येत नाही. त्यामुळे कमी जणांना पासवर्ड मिळत आहे. परिवहन विभागाने यातील त्रुटी दूर कराव्यात.
समीर मकानदार, उस्मानाबाद
उमेदवार वेगळा, ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाइन परीक्षेमुळे तोतया उमेदवार बसून परीक्षा उत्तीर्ण करण्याची शक्यता वाढली आहे. ज्या उमेदवार वेगळा व ऑनलाईन परीक्षा देणारा दुसरा व्यक्ती असल्यास शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेला उमेदवार पुढे जाईल व अपघाताच्या घटना घडू शकतात.
१६४ ऑनलाईन लायसन्स
१४ जून पासून जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने लर्निंग लायसन्स मिळण्याची सुविधा आरटीओ कार्यालयामार्फत उपलब्ध करुन दिली आहे. अद्यापर्यंत १६४ वाहनधारकांनी लर्निंग नायसन्स काढले आहे.