शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

युवा नेता होण्यापेक्षा युवकांचा नेता होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवकांचे संघटन बांधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे युवकांचे संघटन करताना युवा ...

उस्मानाबाद : राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवकांचे संघटन बांधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे युवकांचे संघटन करताना युवा नेता नको तर युवकांचा नेता असला पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले.

युवा मोर्चाच्यावतीने येथे आयोजित युवा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, युवा वाॅरियर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे, मराठवाडा संयोजक प्रेरणाताई होनराव, जिल्हा प्रभारी अरुण पाठक, ॲड. अनिल काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, इंद्रजित देवकते, दिग्विजय शिंदे, अभय इंगळे, अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, भाजपच्या फादर बॉडीचा एक गट तयार करून त्यांच्या माध्यमातून युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांना योग्य दिशेने व झपाट्याने कार्य करण्यास गती मिळेल. तसेच युवा संघटनेत अनेक पदे देण्यात येतात. या पदाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी युवा-युवतींचा आवाज होण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत.

भाजपामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळते. मात्र त्याच्यामध्ये ती धमक असली पाहिजे. विशेष म्हणजे आजपर्यंत आंदोलने केली असली तरी यापुढच्या काळात अनेक आंदोलने करावी लागणार असून त्यासाठी आक्रमक युवा आपल्याला घडवावे लागणार आहेत. बिगर राजकीय (नॉन पोलिटिकल) युवा वर्गाला जोडून घेणे आवश्यक असून यामध्ये खेळ, साहित्य, उद्योग व कला यासह विविध क्षेत्रातील युवकांचा समावेश करून मजबूत संघटन केले तरच युवावर्गाला जोडण्याची संकल्पना यशस्वी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राहूल लोणीकर, जिल्हा प्रभारी अरुण पाठक आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केले.

युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

यावेळी भाजयुमो जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात मकरंद पाटील, सचिन घोडके (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), अमित कदम, राहुल शिंदे, रोहित दंडनाईक, संताजी वीर, अभिराम पाटील, बाळासाहेब घोडगे, वैभव मुंडे, दिनेश बागल, प्रवीण घुले, फेरोज पठाण, अमोल माकोडे (जिल्हा उपाध्यक्ष), गणेश देशमुख, देवकन्या गाडे, ॲड. कुलदीपसिंह भोसले (सरचिटणीस), सचिन लोंढे (आत्मनिर्भर जिल्हा संयोजक), पूजा देडे (युवती प्रदेश कार्यकारिणी सदस्य), पूजा राठोड, (जिल्हा युवती प्रमुख), राज निकम, प्रितम मुंडे, गणेश इंगळगी, किशोर तिवारी, रियाज पठाण, नीलेश पाटील, प्रसाद पानपुडे, रामकृष्ण घोडके, गणेश एडके, श्रमिक पोद्दार, ओमकार देशमुख, बालाजी चव्हाण (चिटणीस), रोहित देशमुख (सह कोषाध्यक्ष),

विशाल पाटील, (विद्यार्थी जिल्हा संयोजक), संजय बोंदर (जिल्हासह संयोजक रोजगार), इंद्रजित साळुंके (स्वयंरोजगार जिल्हा संयोजक),

सलमान शेख, (आत्मनिर्भर जिल्हा सहसंयोजक), बापुराव नाईकवाडी (प्रसिध्दी प्रमुख), विठ्ठल चिकुंद्रे (सह प्रसिध्दी प्रमुख), बालाजी जाधव यांचा समावेश आहे.