शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘सरकार काय झोपा काढतंय का?’; नीट पेपरफुटीवरून बच्चू कडू भडकले, दोषींना फाशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:36 IST

तुळजापुरात बच्चू कडूंचे सरकारला खडेबोल; "गोरगरिबांची पोरं रक्ताचं पाणी करतात आणि ऐनवेळी पेपर फुटतो"; यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

धाराशिव : "अशा पद्धतीने जर वारंवार पेपर फुटणार असतील, तर गरिबांच्या मुलांनी परीक्षा कशासाठी द्यायच्या? सरकार काय झोपा काढतंय का?" अशा अत्यंत तिखट आणि आक्रमक शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले असून, या प्रकरणातील दोषींना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

रविवारी आमदार बच्चू कडू हे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशात गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणावर विचारले असता, बच्चू कडू यांचा पारा चांगलाच चढला. गाेरगरिबांची पाेरं दिवस-रात्र एक करून, रक्ताचं पाणी करून अभ्यास करतात. गरीब मायबाप आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करतात. मात्र, ऐन परीक्षेच्या वेळी असे पेपर फुटतात. पेपर असा कसा फुटतो? यंत्रणा काय करत आहेत? जर परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेता येत नसतील, तर गरिबांच्या लेकांनी परीक्षा द्यायच्याच कशासाठी?" असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.

दोषींना थेट फाशी द्या
"अशा पद्धतीने पेपर फुटत असेल आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकार म्हणून काहीच करणार नसू, तर आमच्या असण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे सरकारने या प्रकरणातील मुख्य आरोपींना थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे. सरकारने जर यांना फाशी दिली नाही, तर आम्ही त्यांना मारू," असा थेट आणि खळबळजनक इशाराही त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu slams NEET paper leak, demands death for culprits.

Web Summary : Bachchu Kadu expressed outrage over the NEET paper leak, questioning the government's inaction. He demanded capital punishment for those responsible, emphasizing the plight of underprivileged students and the futility of exams if transparency isn't ensured.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूNEET Exam Paper Leakनीट परीक्षा पेपर लीकdharashivधाराशिव