कंपनीच्या जमिनीची परस्पर विक्री

By Admin | Updated: May 14, 2014 00:46 IST2014-05-14T00:46:28+5:302014-05-14T00:46:28+5:30

येरमाळा : कंपनीची जमीन तलाठ्याला हाताशी धरून परस्पर विक्री केल्याप्रकरणी नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Interaction between the company's land | कंपनीच्या जमिनीची परस्पर विक्री

कंपनीच्या जमिनीची परस्पर विक्री

येरमाळा : कंपनीची जमीन तलाठ्याला हाताशी धरून परस्पर विक्री केल्याप्रकरणी नऊ जणांविरूध्द उच्च न्यायालयाच्या आदेशावरून येरमाळा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेरखेडा केमीकल्स प्रायव्हेट लि़ या कंपनीच्या उभारणीसाठी उल्का प्रदिप जैन यांचे वडील रामचंद्र लोढा यांनी आर्थिक मदत केली होती़ कंपनीच्या कामास सुरूवात झाल्याने लोढा यांनी वारंवार पैशाची मागणी केली तरी त्यांना पैसे मिळत नव्हते़ त्यामुळे १९९५ साली त्यांनी या संदर्भात न्यायालयात दावा दाखल केला होता़ न्यायालयाच्या आदेशाने १८ टक्के व्याजाने रक्कम परत द्यावी असे आदेश होते़ तर २००४ साली कंपनीची ३२ एकर जमीन जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले़ कंपनी बंद पडल्याने यातील पाच संचालकांपैकी चौघांनी राजीनामे दिल्याने आजपर्यंत कोर्टाने दिलेला जास्तीचा हुकूम कायम होता़ असे असताना तेरखेडा येथील कांतीलाल चंदूलाल बोराणा यांनी तलाठ्याशी संगनमत करून स्वत:च्या नावे कंपनीची ३२ एकर जमीन केली़ याबाबत न्यायालयात प्रकरण सुरू होते न्यायालयाने जास्तीचा हुकुमनामा काढला होता़ तरीही तेरखेडा येथील महेश बिभीषण खामकर, श्रीराम बिभीषण खामकर यास १५ एकर जमीन विकण्यात आली़ यात बरकतअली युसूफअली पाटणवाला हे कंपनीची सीईटो म्हणून खोटी कागदपत्रे दाखल करून शासनाची फसवणूक करून लाखो रूपये हडप केल्याबाबत न्यायालयात तक्रार देण्यात आली होती़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून कांतीलाल चंदूलाल बोराणा (तेरखेडा), तलाठी एस़बी़मोरे, सूचित दत्तात्रय शिंदे (तेरखेडा), महेश बिभीषण खामकर (तेरखेडा), श्रीराम बिभीषण खामकर (तेरखेडा), गणपत महादेव पाटील (कल्याण), अजगरभाई हुसेन साच्यावाला, बरकत अली युसूफअली, हातीमभाई महंमद भाई (तिघे रा़मुंबई) यांच्याविरूध्द येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Interaction between the company's land