शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:09+5:302021-07-14T04:38:09+5:30

(फोटो : समीर सुतके १३) उमरगा : कोरोनाकाळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले कार्य घराघरांत पोहोचवून शिवसंपर्क ...

Implement Shiv Sampark Abhiyan effectively | शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा

शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवा

(फोटो : समीर सुतके १३)

उमरगा : कोरोनाकाळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले कार्य घराघरांत पोहोचवून शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबवावे, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भगवा फडकविण्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिकांची नोंदणी करावी, असे आवाहन माजी खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात दि. १२ ते २१ जुलै यादरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने मंगळवारी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी किरण गायकवाड, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. आभार तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे यांनी मानले. यावेळी लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, जि. प. सदस्य शेखर घंटे, युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, अमोल बिराजदार, शिवसेना गटनेते संतोष सगर, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अभिमान खराडे, श्याम नारायणकर, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, श्रीकांत भरारे, अमीन सुंभेकर, महेबूब गवंडी, अविनाश माळी, भरत सुतार, सरपंच नामदेव लोभे, परवेज तांबोळी, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, शेखर मुदकन्ना, शेखर पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रदीप शिवणेचारी, लिंगराज स्वामी, प्रशांत पोचापुरे, संदीप जगताप, भगत माळी, बाबासाहेब कटारे, संदीप चव्हाण, विक्रम दासमे आदी उपस्थित होते.

Web Title: Implement Shiv Sampark Abhiyan effectively